दिगंबर दुर्गाडेंचा मोठा विजय; दादापाटील फराटेंसाठी जिल्हा बँकेचे स्वप्न अधुरे...

PDCC Bank Election : अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून फराटेंचा तब्बल ६८४ मतांनी पराभव
Digambar Durgade

Digambar Durgade

Sarkarnama

पुणे : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आणखी एका माजी अध्यक्षांनी विजय मिळवला आहे. 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राष्ट्रवादीच्या दिगंबर दुर्गाडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी रिंगणात उडी घेतली होती. मात्र त्यांना अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे दादापाटील फराटेंसाठी जिल्हा बँकेचे स्वप्न अधुरे राहीले आहे.

पुणे जिल्हा बँकांच्या २१ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर ७ जागांसाठी निवडणूक होवून २ जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. याची मतमोजणी आज पार पडली. यात मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे यांनी गुलाल उधळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशामुळे मुळशीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते चांदेरे यांच्यासाठी मत गोळा करण्यात रात्रीचा दिवस करून पळत होते. याचा परिणाम म्हणून चांदोरे यांना २८ मत मिळाली, तर कलाटे यांची गाडी १७ वरचं थांबली.

<div class="paragraphs"><p>Digambar Durgade</p></div>
पुणे जिल्हा बँक : मुळशीत कलाटेंना धक्का, राष्ट्रवादीच्या चांदेरेंचा गुलाल

तर हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष राष्ट्रवादीच्या प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादीचेच विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा ११ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते. म्हस्के आणि दांगट दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. मात्र याठिकाणचा उमेदवारीचा पेच सोडवण्यात अपयश आल्याने पक्षाने याठिकाणी मैत्रीपुर्ण लढत जाहिर केली होती.

<div class="paragraphs"><p>Digambar Durgade</p></div>
पुणे जिल्हा बँक : अशोक पवारांचा एकहाती विजय; सातवे आमदार संचालक

तिसऱ्या शिरुर तालुका अ वर्ग मतदार संघातून आमदार अशोक पवार यांनी एकहाती विजय मिळवला आहे. या निमित्ताने आता आमदार-संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अशोक पवार हे सातवे आमदार ठरले आहेत. पवारांना १३१ पैकी १०९ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील आबासाहेब गव्हाणे यांना २१ मते पडली. १ मत बाद झाल्याने निकाल १०९ : २१ असा जाहीर झाला आणि पुणे बॅंकेत आमदार अशोक पवार यांनी प्रवेश मिळविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com