अजित पवारांनी बोट नाही ठेवले...पण दुर्गाडे थोरातांना जाऊन भेटले...!

अवघ्या एकाच दिवसात अध्यक्ष दुर्गाडे यांनी माजी अध्यक्ष थोरातांचे घर गाठल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवारांनी बोट नाही ठेवले...पण दुर्गाडे थोरातांना जाऊन भेटले...!
Digambar Durgade-Ramesh Thoratsarkarnama

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (pdcc bank) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे (Digambar Durgade) यांनी आज (ता. १७ जानेवारी) बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांची त्यांच्या खुटबाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. डॉ. दुर्गाडे यांची निवड शनिवारीच (ता. १५ जानेवारी) झाली आणि अवघ्या एकाच दिवसात अध्यक्ष दुर्गाडे यांनी माजी अध्यक्ष थोरातांचे घर गाठल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Digambar Durgade meet to former MLA Ramesh Thorat)

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व राखत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी शनिवारी (ता. १५ जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्या. त्यात अनेक बड्या हस्तींना मागे टाकत पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे यांनी बॅंकेचे अध्यक्षपद पटकावले. पवारांनीही धक्का तंत्राचा अवलंब करत आमदार-संचालकांच्या इच्छेला न जुमानता दुर्गाडेंकडे बॅंकेचे सूत्रे सोपवली. त्यांच्या जोडीला मुळशीच्या सुनील चांदेरेंकडे उपाध्यक्षपद दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्याच्यावर बोट ठेवतील, तोच अध्यक्ष होणार, असे विधान थोरात यांनी निवडीपूर्वी केले होते. त्यामुळे अजितदादांनी थोरातांवर बोट ठेवले नाही. पण अध्यक्ष दुर्गाडे हे थोरातांच्या भेटीला गेले.

Digambar Durgade-Ramesh Thorat
निवडणुकीतील राडा अंगलट; राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर १२ कलमे लावत गुन्हा दाखल

निवडणुकीनंतर अनेकांना अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली होती. ते स्वतः बोलत नसले तरी अनेकांनी समर्थकांच्या तोंडून आपली इच्छा नेत्यांपर्यंत पोचवली होती. उपमुख्यमंत्र्यांचा स्वभाव पाहता त्यांच्यासमोर ती इच्छा बोलून दाखवण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने योग्य त्या ठिकाणी आपले मन मोकळे केले होते. मात्र, अजित पवारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व इतर ज्येष्ठ नेत्यांशी बोलून जे ठरवले होते, ते नाव त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली.

Digambar Durgade-Ramesh Thorat
निवडणूक नको; म्हणून मी शेकापची बैठक सोडून अलिबागला निघून आलो होतो...

गेल्या पाच वर्षांत बॅंकेचा कारभार पाहणारे आणि सलग ३७ वर्षे संचालक असलेले रमेश थोरात यांनाही अध्यक्षपदाची इच्छा होती. ती रास्तही होती. कारण, नोटबंदी आणि कोविडसारख्या अडचणीच्या काळातसुद्धा त्यांनी बॅंकेचा कारभार अत्यंत कौशल्याने सांभाळला. विशेषतः नोटबंदी काळात बॅंकेची अडकलेली रोकड परत मिळविण्यासाठी मोठी धडपड केली. अनेकदा दिल्लीवाऱ्याही केल्या. खुद्द शरद पवार यांच्यासह ते केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटले होते. त्यामुळे त्यांना वर्षभरापुरती संधीची अपेक्षा होती. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता, त्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूती होती. त्याचा आणि बॅंकेतील कामगिरीचा विचार करून त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. थोरात यांच्याबरोबर, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार यांचीही अध्यक्षपदासाठी इच्छा होती.

Digambar Durgade-Ramesh Thorat
फटेकडून फसवणुकीची सुरुवात बारावीपासूनच... आई म्हणून 'मेस'मधील महिलेला केले उभे!

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी आज खुटबाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी निवडीबद्दल त्यांचे कुटुंबीयांच्या वतीने अभिनंदन केले, असे रमेश थोरात यांनी भेटीबाबत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.