राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची जिरवण्याच्या भानगडीत पडू नये!

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला
Digambar Durgade
Digambar DurgadeSarkarnama

भोर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (ncp) जरी कार्यकर्त्यांची गर्दी झाली तरीही मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे कार्यकर्त्यांना गोड स्वाद घेता आला पाहिजे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची जिरवण्याच्या भानगडीत पडू नये, असा सल्ला पुणे जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. (Digambar Durgade, Chairman, pdcc Bank advises NCP office bearers)

भोर तालुक्यातील अंबाडे येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये प्रा. दुर्गाडे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. दुर्गाडे म्हणाले की, आगामी निवडणुकीत सगळ्यांनी वज्रमूठ करुन लढल्यास आपणाला यश नक्की मिळेल. राजकारण न करणे हेच खरे राजकारण असते. यासाठी मीपणा सोडून काम केले पाहिजे.

Digambar Durgade
फडणवीसांनी जबाबदारी सोपवली अन्‌ कल्याणशेट्टींनी यशस्वी करून दाखवली!

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे म्हणाल्या की, पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून काम केल्यास पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला योग्य न्याय मिळतोच. त्यामुळे सर्वांनी पक्षाचे काम निष्ठेने करावे.

Digambar Durgade
हायकमांडने आदेश देताच सत्तास्थापनेचा दावा करू : फडणवीसांचे वक्तव्य!

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, भालचंद्र जगताप, सभापती लहू शेलार, चंद्रकांत बाठे, सुनीता बाठे, पल्लवी शिवतरे, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा विद्या यादव, शहराध्यक्ष नितीन धारणे, सरपंच कविता खोपडे, मानसिंग धुमाळ या वेळी उपस्थित होते.

Digambar Durgade
प्रमोद सावंतांनी सांगितली भाजप सरकार स्थापनेची स्ट्रॅटेजी!

रणजीत शिवतरे यांच्या प्रयत्नातून अंबाडेमधील १ कोटी ९८ लाख १२ हजार रूपयांच्या विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजनचे पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये शाळा दुरुस्ती, शाळा संरक्षक भिंत, शाळेसह पाण्याची टाकी, क्रीडा साहित्य, रस्ता काक्रिटीकरण, गटर, बंधारा, समाज मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर दुरुस्ती, अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, कोळेवाडी रस्ता व गटर आदींचा समावेश आहे. कविता खोपडे यांनी प्रास्ताविक केले. मनोज खोपडे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद खोपडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com