ब्रिजभूषण सिंहांना तुम्ही मॅनेज केले? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं...
Sharad Pawar|Brijbhushan Singh|

ब्रिजभूषण सिंहांना तुम्ही मॅनेज केले? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं...

Sharad Pawar|Brijbhushan Singh| उत्तर भारतीयांची मापी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नसल्याची भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

पुणे : महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी शनिवार (4 जून) पुण्यात मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्या. ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्येच्या भूमीत पाय ठेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. (Sharad Pawar Latest news update)

त्यावर तुम्ही ब्रिजभूषण सिंह यांना मॅनेज केल्याचा आरोप करण्यात आला. असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, "'मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेचा ३० वर्षापासून अध्यक्ष आहे, मी अध्यक्ष असताना राष्ट्रीय संघटनेचं काम ब्रिजभूषण पाहतात. आम्हा लोकांना तिथं लक्ष द्यायला वेळ नाही. ते दिल्लीमध्ये असतात त्यामुळं ते या कामात लक्ष घालतात. त्यांची काही मते आहेत, विचारधारा आहे. पण आम्ही खेळाच्या क्षेत्रामध्ये ते आणत नाही आणि त्यांनी जी काही मतं मांडली ती त्यांची वैयक्तिक मतं होती, त्यांना कुणी मॅनेज केलं हे डोक्यातून काढून टाका. ब्रिजभूषण हा कोण मॅनेज करू शकेल, अशी व्यक्ती नाही, असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

Sharad Pawar|Brijbhushan Singh|
Rajyasabha Election : मनसेचे मत कुणाला ? ; राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर मनसे नेते सचिन मोरे यांच्याकडून ट्विटरवर एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. त्यात खासदार शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह एकत्रितपणे एका व्यासपीठावर बसले होते. त्यावरुन शरद पवारांनींच ब्रिजभूषण यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळीही राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रॅस्टो यांनी ट्विट करूनच मनसेला उत्तर दिले होते. 'काही लोक घाबरले आहेत आणि ती भीती लपवण्यासाठी फोटोंमध्ये कारणे शोधत आहेत. घाबरून त्यांनी स्वतःच अयोध्या दौरा रद्द केला आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघ आणि राज्य कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांच्या कुस्ती स्पर्धेत काढलेला दोन वर्षांपूर्वीचा फोटो आज व्हारल केला. पण, ये पब्लिक हैं, ये सब जानती हैं.''असं म्हणत त्यांनी मनसेला उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो ट्विट केला. मनसेने हिंदीत जे वाक्य लिहिले तेच वाक्य त्यांनी मराठीतही लिहिले. “आधारवड”. पवार साहेब! (काही फोटो चांगले ही असतात आणि खरेही) (हिंदी भाषांतर जाणीवपपुर्वक टाळले आहे), असे ट्विट करत मिटकरी यांनी मनसेला उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in