शरद पवार यांचे निमंत्रण अमित शाहंनी स्वीकारले की नाही ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.
शरद पवार-अमित शाह
शरद पवार-अमित शाहसरकारनामा

पुणे : सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्या पुणे दौऱ्यात अमित शाह हे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला () भेट देणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी सर्वत्र झळकल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांना आज पाठविलेल्या पत्रकात या दौऱ्याचा उल्लेखही होता. मात्र, सायंकाळी पाठविलेल्या सुधारीत प्रसिद्धीपत्रकातून ‘व्हीएसआय’च्या भेटीचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे शाह यांनी शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारले की नाही, याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शरद पवार-अमित शाह
पुणे महापालिकेपुढे पेच : गडकरींचे ऐकावे तर २५ कोटींचा वाढणार खर्च

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपलिका व शहर भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या संदर्भातील माहिती शहराध्यक्ष मुळीक यांनी पत्रकात दिली आहे. सहकार मंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शाह पहिल्यांदाच पुणे भेटीवर येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शाह २६ रोजी सकाळी वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेला भेट देणार आहेत. त्यानंतर संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते होणार आहे.

शरद पवार-अमित शाह
गोखलेंसोबत काम करणार नाही ; राष्ट्रीय पुरस्कारविजेता निर्मात्याची घोषणा

शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा दुपारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शाह प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मुळीत यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार हे ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी पवार यांनी शाह यांना ‘व्हीएसआय’ भेटीचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येते. पवार यांचे निमंत्रण शाह यांनी स्वीकारल्याचेही सांगण्यात येते. या पाश्‍र्वभूमीवर शहर भाजपाच्या आजच्या प्रसिद्धीपत्रकात या भेटीचा उल्लेख करण्यात आला. मात्र, काही वेळाने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या सुधारीत पत्रकात ‘व्हीएसआय’च्या भेटीचा उल्लेख काढण्यात आल्याने शाह व्हीएसआयला भेट देणार की नाही अशी चर्चा रंगली आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com