Ajit Pawar : हिंदू राष्ट्र समितीच्या धनंजय देसाईंची अजित पवारांवर अर्वाच्च भाषेत टीका; म्हणाले...

Pune News : आदिलशाहीने जो गाढवाचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला...
Ajit Pawar, Dhananjay Desai
Ajit Pawar, Dhananjay Desai Sarkarnama

Hindu JanAakrosh Morcha : पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन रविवारी (दि.२२) करण्यात आले होते. यावेळी हिदू राष्ट्र समितीचे धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली आहे. यावेळी त्यांनी धरणात मुतण्याची भाषा करुन शेतकऱ्यांच्या ओल्या जखमांवर आणखी जखमा करणारे आता इतिहासाबाबतही आक्षेपार्ह विधानं करु लागले आहेत, त्यांना डायपर घातलं पाहिजे अशा शब्दांत थेट नाव न घेता अजित पवारांवर जहरी टीका केली आहे.

धनंजय देसाई हे पुण्यातील जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. देसाई म्हणाले, संभाजी महाराज धर्मवीर नव्हते? कदाचित तुम्ही पवार नसू शकाल पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते अशा भाषेत देसाईंनी पवारांवर हल्लाबोल केला.

Ajit Pawar, Dhananjay Desai
Aditya Thackeray News : गद्दार वाचणार नाहीच, त्यांना आज ना उद्या घरी जावे लागणार..

पुण्यात आदिलशाहीचा उकिरड्यावरून आलेल्या काही सरदारांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाचं नांगर फिरवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. शेतकऱ्यांनी कितीही मशागत केली तरी काँग्रेस उगवतच. त्याला वारंवार खुरपावे लागते. तसं आदिलशाहीने जो गाढवाचा नांगर फिरवला तो बारामतीपर्यंत गेला अशा शिवराळ भाषेत टीका केली आहे.

Ajit Pawar, Dhananjay Desai
Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट आली समोर!

तेलंगणाचे आमदार राजा भैय्या नेमकं काय म्हणाले?

धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. मी जनतेला सांगेल की कोणी मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा लढले नसते तर आज हिंदू नसते. औरंगजेब समोर झुकले असते तर हिंदू आज सुरक्षित असता का? राज्यातील नेत्यांना मी सांगेल की या गोष्टीचे घाणेरडे राजकारण करू नका. मी धर्मवीर संभाजी महाराजांचा मी भक्त आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यादिवशी बलिदान दिलं तो धर्मवीर दिन म्हणून घोषित करा अशी मागणी राजा भैय्या यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in