देवेंद्र फडणवीसांची जादू विधान परिषद निवडणुकीतही दिसणार!

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती, तरीही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ती जागा जिंकली.
देवेंद्र फडणवीसांची जादू विधान परिषद निवडणुकीतही दिसणार!
Devendra Fadnavis-Mahesh LandageSarkarnama

पिंपरी : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती, तरीही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ती जागा जिंकली. त्यांचा हा करिष्मा यापुढे राज्यभर चालणार आहे, असा विश्वास भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी आज (ता. ११ जून) व्यक्त केला. (Devendra Fadnavis's magic will also be seen in the Legislative Council elections)

Devendra Fadnavis-Mahesh Landage
महाडिकांच्या गुलालाचा खरा धक्का शिवसेनेपेक्षा सतेज पाटलांना बसलाय!

फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीचे अचूक नियोजन केले. संख्याबळ नसताना त्यांनी सहावी जागा लढवण्याची जोखीम पत्करली. ती यशस्वीही करून दाखवली. विधानसभेतील अन्य पक्षांच्या आमदारांचाही फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे, असे आमदार लांडगे म्हणाले. राज्यसभेतील विजयाचा हा सिलसिला विधान परिषद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चित दिसेल, असा दावाही लांडगे यांनी केला.

Devendra Fadnavis-Mahesh Landage
त्यावेळी मला मंत्रीपदाची ऑफर होती; पण... : राऊतांच्या आरोपाला संजय शिंदेंचे उत्तर

लक्ष्मण जगतापांची पक्षनिष्ठा प्रेरणादायी...

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून तीन तासांचा प्रवास करीत मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले. माझ्यासारख्या भाजप कार्यकर्त्यासाठी ही प्रेरणादायी बाब आहे. त्याचबरोबर पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही आजारपणात पक्षाशी असलेली बांधिलकी कृतीतून दाखवून दिली. ‘‘राष्ट्र प्रथम...’’ या ध्येयाने काम करणारे पक्षाच्या सर्व आमदारांसाठी जगताप आणि टिळक यांनी आदर्श घालून दिला आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in