Sahakar Parishad : ''महाराष्ट्रातील साखर उद्योग शाहंच्या निर्णयामुळे ताठ मानेनं उभा''

Devendra Fadnavis : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Pune News : ''अमित शाह हे सहकार क्षेत्रातील नेतृत्व आहे. त्यांनी सहकारी संस्थापासून थेट राज्य सहकारी बॅंकांपर्यंत सहाकार क्षेत्रात काम केले आहे. जिल्हा सहकारी बँका संभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सहकार क्षेत्राशी जवळचे नाते आहे.''

''ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अडचणी घेऊन त्यांच्याकडे जात होतो. त्यावेळी तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे काम त्यांनी केले. कारखान्यांसाठी इनकम टॅक्सचा जो मुद्दा होता तो वर्षानुवर्षे अडचणीचा ठरत होता. मात्र, तो देखील त्यांनी मार्गी लावला आहे'', असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ माध्यम समूहाच्यावतीने बँकींग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानत त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक, संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय नंतर काय असणार भाजपचे पुढचे लक्ष? प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर

तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना कर्तव्यनिष्ठ सहकारमंत्री असे संबोधले. फडणवीस पुढे म्हणाले, ''गेल्या काही वर्षात सहकार क्षेत्राची भरभराट झाली. अमित शाह यांनी चांगले निर्णय घेतले त्यामुळे सहकार क्षेत्राला फायदा झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की इनकम टॅक्सचा जो मुद्दा आहे तो वर्षानुवर्षे अडचणीचा ठरत होता. त्यावर कोर्टाचे निर्णय मग त्यावर पुन्हा सर्वोच्च कोर्टाचे निर्णय, यामुळे एक टांगती तलवार सहकारी कारखान्यानवर होती''.

''अनेकवेळा कारखानदार विचारायचे शेतकऱ्यांना आम्ही पैसे दिले त्यात आमची काय चूक? पण त्यावर काही उपाय निघत नव्हता. मात्र, मागच्या काळात आम्ही सर्व मिळून अमित शाह यांच्याकडे गेलो. त्यानंतर त्यांना आम्ही हा प्रश्न सांगितला. त्यावर त्यांनीच सांगितले की हे चुकीचे आहे. यावर मार्ग काढावा लागेल. त्यानंतर तात्काळ त्यांनी या संदर्भातला पहिला निर्णय घेतला. 2016 नतंरचा इनकम टॅक्सचा प्रश्न त्यांनी संपवला.

Devendra Fadnavis
Shivsena Symbol : तुमाणेंनी फोडला बाँब : ठाकरेंचे 2 खासदार, 10 आमदार फुटणार असल्याचा दावा!

''पण एक जटील प्रश्न होता 2016 च्या आधीचे काय? त्यामध्येही एक मोठी अडचण होती. मात्र, त्यांनी सांगितले की यावरही मी मार्ग काढतोय. त्यांनी स्वत: त्यामध्ये लक्ष घातले. नेहमी प्रमाणे याआधी अधिकारी निगेटिव्ह लिहायचे.

अधिकाऱ्यांनी लिहून सर्व निगेटिव्हच केले होते. पण सहकाराची जाण असलेले आणि पहिले सहकारमंत्री अमित शाह यांनी यातून वित्तविभागाला विश्वासात घेऊन यातून मार्ग काढला. त्यामुळे जवळपास 10 हजार कोटीचा इनकम टॅक्स त्यांनी माप केला''.

''एवढंच नाही तर ज्यां कारखान्यांनी इनकम टॅक्स भरला. त्या कारखान्यांना तो रिफंड मिळणार आहे. यामुळे त्या कारखान्याची अवस्था आणि 'कॅश फ्लो' सुधारेल. इतकी मोठी मदत शाह यांच्या माध्यमातून मिळाली. खरे म्हणजे मोदी सरकारमध्ये साखर उद्योगाबाबत जे निर्णय झाले ते खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला फायदा देणारे ठरलेत''.

Devendra Fadnavis
Opposition PM Candidate : विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरला? अभिषेक बॅनर्जींचा मोठा दावा

''इथेनॉलच्या पॉलिसीमुळे खरं तर आमचे कारखाने उभे राहिले. किमान सेलिंग प्राइस ही जर इनहोक केली नसती तर अनेक कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले असते. तसेच हा साखऱ्याच्या दराचा बॅलन्स बिघडला असता. प्रत्येकवेळी त्यांनी निर्णय घेतले त्याचा फायदा झाला.

अशी कुठलीही अडचण आली की आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि ते लगेच ते सोडवायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग हे शाह यांच्या निर्णयामुळे ताठ मानेने उभा आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो'', असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे गुरुजी खुशीत

''तसेच सकाळ माध्यम समूहाचे आभार. सकाळ माध्यम समूह वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवत असतो. अॅग्रोवनच्या माध्यमातून शेती क्षेत्रातले योगदान हे अत्यंत मोठं आहे. मागच्या काळामध्ये जेव्हा सरकार होतं तेव्हा सकाळसोबत स्किल डेव्हलपमेंटचे काम केले.

यामध्ये मोठ्या प्रमाणात गट शेतीचा विषय आणि स्किल डेव्हलपमेंट तसेच शेती क्षेत्रासंदर्भातील काम केले. यापुढेही आम्ही तुमच्याबरोबर काम करू'', असं म्हणत त्यांनी सकाळ माध्यम समूहाचेही आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com