पडळकरांना अडवताच फडणवीस पाठीशी उभे राहिले अन् म्हणाले...

अहिल्यादेवींच्या मार्गावर चालणाऱ्या पडळकरांना रोखणे चुकीचे
पडळकरांना अडवताच फडणवीस पाठीशी उभे राहिले अन् म्हणाले...
Devendra Fadnavis Sarkarnama

पिंपरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज चौंडी (ता.जामखेड,जि.नगर) येथे झाला. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मात्र, तेथे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. जयंतीचा हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसनं हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.

अहिल्यादेवींच्या मार्गावर चालणाऱ्या पडळकरांना अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणे चुकीचे आणि निंदनीय असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात चिखली येथे भरविलेल्या देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला शेवटच्या पाचव्या दिवशी फडणवीस यांनी भेट दिली. घाटात बसून त्यांनी बैलगाडा शर्यत पाहिली. नंतर पुण्याला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं.

Devendra Fadnavis
भाजपचं सोशल इंजिनिअरींग! राज्यसभेला निम्म्याहून अधिक जागांवर ओबीसी अन् दलित

शरद पवारांच्या उपस्थितीत चौंडीचा कार्यक्रम झाला. मात्र, त्याला उपस्थित राहण्यापासून आमदार गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी अडवले. हा कार्यक्रम झाल्यानंतर पडळकरांना तिथे जाऊ देण्यात आले. त्यावरून फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार व गृहखाते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धारेवर धरले.

Devendra Fadnavis
सिद्धू मूसेवालानंतर आणखी एक पंजाबी गायक हिटलिस्टवर!

पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबईसह राज्यातील पालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. मात्र, तेथील निवडणुका कधी होतील, हे निश्चित नाही. त्यावर आरक्षण सोडत निघाली, मग आता या निवडणुका वेळेत होतील का? असे विचारले असता ते राज्य निवडणूक आयोगाला ठरवायचंय, असं सांगत फडणवीसांनी हा मुद्दा टोलवला. आमदार लांडगेंच्या बैलगाडा शर्यतीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले, असेही त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in