बाबासाहेब पुरंदरेंना `महाराष्ट्र भूषण` दिला, ही अभिमानाची गोष्ट

बाबासाहेबांनी (Babasaheb Purandare) तरुणांना गडकिल्ल्यांचे वेड लावले. असे मनोगत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.
बाबासाहेब पुरंदरेंना `महाराष्ट्र भूषण` दिला, ही अभिमानाची गोष्ट
Devendra Fadnavis & Babasaheb PurandareSarkarnama

पुणे : दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे शिवसृष्टी निर्मितीचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत शनिवारी (ता.२७ नोव्हेंबर) बाबासाहेब पुरंदरे यांना पुणेकरांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्रद्धांजली सभेत बोलतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबासाहेबांना `महाराष्ट्र भूषण` देण्याचे भाग्य मला लाभले ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis & Babasaheb Purandare
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' दोघांनी उडवली देशाची झोप

यावेळी राजमाता कल्पना राजे भोसले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, सत्यशील दाभाडे, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, माजी खासदार प्रदीप रावत आदी उपस्थित होते.

या श्रद्धांजली सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, इतिहास तज्ज्ञ डॉ. गजानन मेहेंदळे, इतिहास संशोधक विजयराव देशमुख आदींनी चित्रफितीद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.

Devendra Fadnavis & Babasaheb Purandare
पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला होता...

फडणवीस म्हणाले, 'जाणता राजा'चे प्रयोग नागपुरात व्हायचे, तेव्हापासून बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी परिचय झाला. त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभले. आपण एक अमोघ वक्तृत्वाचा धनी आपण गमावला आहे. शिवाजी या तीन पवित्र अक्षरांमध्ये त्यांचे संपूर्ण जीवन सामावले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या-ज्या मार्गाने प्रवास केला आणि ज्या साधनांनी केला, तसा प्रवास बाबासाहेबांनी केला. केवळ इतिहास त्यांनी सांगितला नाही, तर त्याची वर्तमानाशी सांगड घातली.

याबरोबरच ते म्हणाले, बाबासाहेबांनी तरुणांना गडकिल्ल्यांचे वेड लावले. बाबासाहेब वडिलांना गुरुस्थानी मानत. पुरंदरे घराण्याची दानाची परंपरा त्यांनी नित्यनेमाने जपली. इतिहासातील अनेक नायकांची चरित्र त्यांनी समाजापुढे आणली. बाबासाहेबांना अनेक पुरस्कार अनेक मान्यवरांकडून मिळाले. मात्र, ते कायम विनम्र राहिले. शिवाजी महाराज अभ्यासायचे नाही, तर त्यांचे विचार जगण्याचा प्रयत्न करायचा, हीच त्यांची शिकवण होती. बाबासाहेब पुरंदरे कायम शिवकाळात जगले व अनेक पिढ्या त्यांनी शिवचरित्र सांगून घडविल्या. आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवसृष्टीसाठी समाजाने हातभार लावणे हे आवश्यक असल्याचे मनोगत फडणवीस यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in