
पुणे : ''नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ'', अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पदवीधरबाबत अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.
यावेळी फडणवीस म्हणाले, युवा नेता म्हणून सत्यजीत तांबे यांचे काम चांगलं आहे. पण सत्यजीत तांबे यांना अपक्ष निवडणूक लढवायला लावण्याचे कोणतेही गणित आम्ही घडवून आणलेले नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी ऐनवेळी उमेदवार द्यायचा नाही, असं आम्ही ठरवलं होतं. नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबतचे धोरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करु, असं फडणवीस म्हणाले.
''सत्यजीत तांबे हे एक नेता, व्यक्ती आणि युवा नेता म्हणून चांगलं काम करत आहेत. पण राजकीय निर्णय हे धोरणाप्रमाणे आणि योग्य वेळी करावे लागतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले आहे आणि तेच यासंदर्भातील निर्णय करतील. सत्यजीत तांबे यांना अपक्ष निवडणूक लढवायला लावण्याचे कोणतेही गणित आम्ही घडवून आणलेले नाही'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
मी सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या पुस्तक प्रकाशनाला जरुर गेलो होतो. त्यावेळी तेथे बाळासाहेब थोरातही होते. तसेच इतर पक्षातील नेते देखील होते. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला जाणं यात काही नवीन नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी सर्वांच्या समोर येतील. वाट पहा. आम्ही तेथे उमेदवार कोण द्यावा, यासाठी प्रयत्न करत होतो, पण विखेंनी तेथे उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी असमर्थता दाखवली, असं सांगत फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.