Devendra Fadanvis : पुरंदरचे विमानतळ ठरलेल्या जागेवरच !

फडणवीस यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे विमानतळाच्या जागेबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvissarkarnama

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) हे पूर्वी ठरलेल्या जागेवरच होणार आहे. या विमानतळाच्या सर्व परवानगी जुन्या जागेवरच्याच आहेत. त्यामुळे या विमानतळाची जागा बदलली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांनी पुण्यात बोलताना आज स्पष्ट केले.

Devendra Fadanvis
दसरा मेळावा : पंकजा मुंडेसारखी वेळ उद्धव ठाकरेंवर येणार का?

फडणवीस यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे विमानतळाच्या जागेबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एका खासगी कंपनीकडून प्रस्ताव आला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
राधाकृष्ण विखेंनी अशोक चव्हाणांचे केले भाजपत स्वागत : नाना पटोलेंना दिल्या कानपिचक्या

पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. पूर्वनियोजनानुसार हे विमानतळ खेड तालुक्यात होणार होते. परंतु तेथील स्थानिकांनी विमानतळासाठी आवश्‍यक असणारी जागा देण्यास नकार दिला. या विमानतळाला आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध केला. त्यामुळे सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हेच विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रस्तावित विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण केलेले आहे.

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या विमानतळाला जमिनी देण्यास प्रथमपासून तीव्र विरोध सुरु केला होता. तेथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तेथील जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी याही विमानतळाची जागा बदलण्याचा प्रस्ताव तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com