Devendra Fadnavis यांनी सुत्रं हलवली अन् कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची सुटका झाली !

Devendra Fadnavis : खापरे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करुन विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार उमा खापरे यांच्यामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या युवकाची सुटका झाली आहे. सागर सुभाष संकपाळ (वय २८, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) असे या युवताचे नाव आहे. (Devendra Fadnavis latest news)

तो कुवेत (दुबई) येथे जादा पगाराच्या अमिषाने कामासाठी गेला होता. पण त्याची फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मायदेशी परत येण्याचे ठरवले. मात्र, संबधीत कंपनीने त्याचा मोबाईल, पासपोर्ट जप्त केल्यामुळे त्याला मायदेशी येणे शक्य नव्हते.

Devendra Fadnavis
Police Transfers : ठाकरे सरकारने साईड पोस्टिंगवर पाठवलेल्या अधिकाऱ्यांना फडणवीसांनी पुन्हा मुंबई आणले..

सागरला सुमारे दीड महिना काम करुनही व्यवस्थित वेतन मिळाले नाही. त्यान कंपनीतील अधिकाऱ्यांना मायदेशी सोडण्याची मागणी केली. तेव्हा त्याचा पासपोर्ट व मोबाईल जप्त केला. हतबल झालेल्या सागरने आपल्या भाऊ रोहित याला फोन केला. त्यांनी ही बाब आमदार उमा खापरे यांच्या कानावर घातली. त्यानंतर खापरे यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.

खापरे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करुन विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. खापरे यांनी वारंवार पत्रव्यवहाराचा पाठपुरावा केला. केंद्रीय विदेश मंत्रालयाने खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सागरला मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली.

खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने केंद्रीय विदेश मंत्रालयाशी तत्काळ पत्रव्यवहार केल्यामुळे सागरची १० दिवसात सुखरुप सुटका झाली व तो मायदेशी परतला.आमदार उमा खापरे आणि सागरच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे दिल्ली येथील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in