देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला; आमदार लांडगेंनी मानले आभार

Devendra Fadnavis|Mahesh Landge: महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात फक्त सत्तेचा मलिदा लाटला.
Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News,
Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News, Sarkarnama

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह (OBC Reservation) निवडणुका घेण्याचा आदेश आज दिला. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

"आमच्या विचारांचे सरकार राज्यात आल्यावर तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण देणार, असा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेला शब्द अखेर खरा ठरला, अशी प्रतिक्रिया या सर्वोच्च निर्णयाचे स्वागत करताना भोसरीचे भाजप आमदार व पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी दिली. शिवाय या आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले. (Devendra Fadnavis , Mahesh Landge Latest Marathi News,)

Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News,
जीवघेण्या आजारातून उठलेले आमदार जगताप पुन्हा सक्रिय ; पालिका आयुक्तांना धरले धारेवर

ओबीसी आरक्षणाबाबत महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असे आमदार लांडगे म्हणाले. या निकालामुळे इच्छाशक्ती असेल, तर कोणताही प्रश्न कसा सोडवता येतो, याचा आदर्श महायुती सरकारने घालून दिला आहे, असे लांडगेंनी यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News,
बाळासाहेबांच्या शिवसेनेला काहीही धोका नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या कोंडाळ्याला...

फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळला

लांडगे यांच्यासारखीच प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सचिव असलेले पिंपरी-चिंचवडकर एकनाथ पवार यांनीही पत्रक काढून दिली. ओबीसी समाजाला फडणवीसांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला. महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेलं होतं. त्यांच्या वेळकाढूपणा धोरणामुळे ते परत मिळाले नव्हते. त्यांनी अडीच वर्षात फक्त सत्तेचा मलिदा लाटला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार येताच हे आरक्षण मिळाले, असे त्यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस महायुतीच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेली अडीच वर्षे भाजपसह सर्व ओबीसी संघटना, ओबीसी जनतेने जो संघर्ष केला, त्यामुळे हा मोठा विजय मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com