आमचा घाव वर्मी बसला; आम्ही पोलखोल करतच राहू

BJP|Devendra Fadnavis|Mahavikas Aghadi : भाजपच्या पोलखोल अभियान रथावर आज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे.
आमचा घाव वर्मी बसला; आम्ही पोलखोल करतच राहू
Devendra Fadnavis sarkarnama

पुणे : मला एका गोष्टीचे समाधान आहे की, आमचा घाव वर्मी बसला आहे. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना अस्वस्थ वाटतयं त्यामुळे ते आमच्या या यात्रेवर हल्ला करत आहे. मात्र, त्यांना मी स्पष्ट सांगतो की, तुम्ही कितीही हल्ला केला तरी आम्ही भष्टाचार बाहेर काढणे थांबवणार नाही, असा इशारा भाजप (BJP) नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना दिला आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

Devendra Fadnavis
भाजपच्या पोलखोल अभियान रथावर दगडफेक; लाड म्हणाले हिंमत असेल तर समोर या...

मुंबई भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्प येथील भाजप कार्यालयात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरुवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आदल्या रात्री अज्ञातांकडून त्या रथाचे (वाहनाचे) नुकसान करण्यात आले आहे. या गाडीचे नुकसान हे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. तर गाडीची फोडतोड करणाऱ्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजप चे सगळे नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला समोर जावं लागेल, असा इशाराही लाड आणि भाजप नेत्यांनी दिला आहे.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यात येत आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रात्रीच्या अंधारात हा पाठीमागून हल्ला केला आहे. ज्याप्रकारे 2019 ला पाठीत खंजीर खुपसण्याच काम त्यांनी केल तश्याच प्रकारचा हा हल्ला करण्यात आल्याचे लाड म्हणाले. तर या झालेल्या प्रकाराबाबत फडणवीसांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भ्रष्टाचारी अस्वस्थ झाल्याने ते अशाप्रकारचे हल्ले करत आहेत. मात्र, त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही भ्रष्टाचाराची पोलखोल करतच राहणार असून पोलखोल दौरा थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
बारा आमदारांच्या नावावर फुली..राज्यपालांनी उलट मुख्यमंत्र्यांनाच दुसरी सहा नावं पाठवली?

दरम्यान, राज ठाकरेंची शाल जुनी आहे की, नवी हे काळच सांगेल. याबरोबरच राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत मी जास्त बोलणार नाही ते माझ्या अधिकारातही नाही असे म्हणत फडणवीसांनी प्रश्न टाळला. याबरोबरच महाराष्ट्रात फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांनी पंधरा-वीस वर्षापुर्वी एक पुस्तक लिहल आहे आणि त्या पु्स्तकात त्यांनी सांगितल आहे की, हिंदूत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खर हिदुत्व कुणाच्या रक्तात आहे. त्यामुळे तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा त्याची माहिती मी तुम्हाला देईल, असे माध्यम प्रतिधींना ते फडणवीस म्हणाले. मात्र, मी कोणाला बोललो आहे हे त्यांना आणि जनतेलाही समजले आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.