मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आमदार महेश लांडगेंचा बैलगाडा बसणार का?

Mahesh Landge | देवेंद्र फडणवीसांच्या निकटच्या वर्तुळातील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे
Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News,
Devendra Fadnavis News, Mahesh Landage News, Pune News, Sarkarnama

पिंपरी : राज्यात नुकताच सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) बंडखोर सत्तेत आले. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रालयातील आपल्या दालनातून कामही आज सुरु केले. त्यानंतर आता मंत्रीमंडळाचे वेध सर्वांना लागले आहेत. हा विस्तार ११ जुलैनंतर दोन टप्यात होण्याची शक्यता आहे. त्यात नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटच्या वर्तुळातील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या नावाच्या समावेशाची जोरदार चर्चा आहे.(Mahesh Landage Latest Marathi News)

आमदार लांडगेंना मंत्रीपद मिळाले तर त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडला ते प्रथमच मिळणार आहे. गत टर्ममध्ये त्यांना हुलकावणी दिली होती. ते मावळला मिळाले होते. यावेळी, मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता टिकवून जिल्ह्यातील मावळ, खेड, शिरुर, मंचर, हवेली, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बळ देण्याकरिता भाजप आमदार लांडगेंना मंत्रिपद मग भले ते राज्यमंत्री का असेना देण्याची शक्यता आहे. त्यातून पिंपरी-चिंचवड या अजित पवारांच्या बालेकिल्यात त्यांना शह देण्याची खेळीही भाजप खेळणार आहे.

शहरातील तिन्ही आमदार करण्यासाठी त्यांची मदत त्यांना होणार आहे. सध्या शहरातील तीनपैकी दोन आमदार (चिंचवडला लक्ष्मण जगताप) भाजपचे, तर पिंपरीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आहेत. सध्या राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या शिरूरला २०२४ ला पक्षाचा खासदार करण्याची तयारी भाजपने आतापासून सुरु केली आहे. त्याकरिताही या मतदारसंघात मोडणाऱ्या भोसरीला मंत्रिपद देणे पथ्यावर पडणारे आहे, हे हेरून भोसरीला मंत्रीपद दिले जाऊ शकते.

पुणे जिल्ह्यातून आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे आणि राहुल कुल यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. लांडगे हे पुणे जिल्ह्यात अजित पवारानंतर सर्वााधिक मताधिक्य घेऊन विक्रमी मतांनी निवडून आल्याची बाब त्यांच्या दृष्टीने मंत्रीपद मिळण्याकरिता प्लस पॉईंट ठरणारी आहे.भोसरीचे सलग दोन टर्म प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव करीत लांडगे ७७ हजार २७९ मतांच्या फरकांनी २०१९ ला निवडून आले आहेत.भाजपच्या आमदारांत ही कामगिरी ‘रेकॉर्ड ब्रेक’ आहे. या ‘मेरिट’वर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा दावा शहर भाजपसह त्यांच्या चाहत्यांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in