Pune News : बोलता येत नसतांनाही बंडातात्यांनी केलेली सूचना पाहून फडणवीस झाले भावूक

Pune News : ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत
Devendra Fadnavis, Chandrakant Patil News
Devendra Fadnavis, Chandrakant Patil NewsSarkarnama

Pune News : ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या भेटीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट घेत, प्रकृतीची माहिती घेतली. बंडातात्या कराडकर यांना गुरुवारी (ता. १२) रोजी पक्षाघाताचा त्रास झाला होता. त्यांच्यावर प्राथमिक उपचार फलटण येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते.

शुक्रवार (ता. १३) रोजी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णाल्यामध्ये हलविण्यात आले. रुग्णालयाच्या बाहेर बंडातात्यांचे अनुयायी आणि राज्यातील जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, रुग्णालयाचे कडक नियम पाळून कुणीही आत प्रवेश करत नाही. प्रत्येक जण आपआपल्या परीने परमेश्वराकडे आपल्या परमभक्तास पांडुरंगाने लवकर बरे करावे. अशी प्रार्थना करीत आहेत.

Devendra Fadnavis, Chandrakant Patil News
Laxman Jagtap : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाचे मोदी, शाहांकडून सांत्वन

बंडातात्यांच्या मेंदूमध्ये गाठ झाली असून तात्यांनी किर्तन, प्रवचन सेवेत आपल्या शरीराकडे लक्ष दिले नाही. तात्याना मधुमेह असूनही त्यांनी खूप प्रवास केल्यामुळे असे झाल्याचे त्यांचे निकटचे सहकारी सांगतात. आज देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात येऊन तात्यांची विचारपूस केली. आणि योग्य त्या सूचना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिलेल्या आहेत.

Devendra Fadnavis, Chandrakant Patil News
महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 च्या बाता; अन् विधान परिषदेच्या तीन मतदार संघात तीन तऱ्हा

अशा कठीण परिस्थितीतही बंडातात्यांना बोलता येत नसल्यामुळे कागदावर लिहून नदी प्रदूषण मुक्त करावी. अशी सूचना फडणवीस यांना केली. हे वाचून देवेंद्र फडणवीस भावुक होऊन तात्यांना म्हणाले, 'तात्या काय तुमची निष्ठा आहे! तुम्ही लवकर बरे व्हा! तुमची गरज महाराष्ट्राला आहे!"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com