Devendra Fadanvis :..तर मंत्री किंवा आमदार म्हणूनच कार्यक्रमाला यावे लागले असते !

फडणवीस यांनी उपस्थितांची फिरकी घेतली तरी त्यांच्या या वाक्यातून राजकारणात अनिश्‍चितता किती असते हे जाणवल्याशिवाय राहिले नाही.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री असताना पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले होते. मात्र, काही कारणाने त्यावेळी मी येऊ शकलो नव्हतो. यावर्षी निमंत्रण मिळाले पण मी उपमुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आज आलो नसतो तर कदाचित यापुढे मंत्री किंवा आमदार म्हणूनच या कार्यक्रमाला यावे लागले असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांनी सांगताच एकच हशा पिकला.

Devendra Fadanvis
अमित शाह आणि राज ठाकरेंची खरच भेट होणार का?,बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितले

आज पुणे फेस्टिवलचे कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी उपस्थितांची फिरकी घेतली तरी त्यांच्या या वाक्यातून राजकारणात अनिश्‍चितता किती असते हे जाणवल्याशिवाय राहिले नाही. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. या वर्षीचा फेस्टिव्हलचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis : पुरंदरचे विमानतळ ठरलेल्या जागेवरच !

दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तापालट झाली. एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाखाली चाळीस आमदारांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला. या गटाने भारतीय जनता पक्षाशी युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. तडजोडीत पर्याय म्हणून भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे राज्यात खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी सर्वसाधारण समजूत असताना अचानकपणे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव आले आणि ते मुख्यमंत्री झालेदेखील.

राज्याच्या राजकारणात आणखी एक धक्कादायक घटना घडली. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी दिले. त्यानुसार फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या साऱ्या घडामोडींची राज्याच्या राजकारणात अनेक दिवस चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या मंत्री किंवा आमदार म्हणून कार्यक्रमाला यावे लागले असते, या वक्तव्याला अनेक राजकीय पदर असल्याने त्यावरून कार्यक्रमात हशा पिकला आणि त्याचीच अधिक चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in