Devdutt Nikam News : राष्ट्रवादीला आव्हान देत निवडून आलेल्या देवदत्त निकम यांचा वळसे पाटलांच्या हस्ते सत्कार

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेच्या निमित्ताने वळसे पाटील आणि निकम एकत्र येणार होते.
Dilip Walse Patil-Devdutt Nikam
Dilip Walse Patil-Devdutt Nikam Sarkarnama

पारगाव (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत जिंकून आलेले देवदत्त निकम यांचा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निकम हे भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आहेत, त्या कारखान्याच्या सभेत निकमांचा बाजार समितीवरील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला. त्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. (Devdutt Nikam felicitated by Dilip Walse Patil)

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) बंडखोर संचालक देवदत्त निकम आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची बाजार समितीच्या निवडणुकीनंतर समोरासमोर भेट झाली नव्हती. दोन दिवसांपूर्वी देवदत्त निकम वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सर्व निर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला होता.

Dilip Walse Patil-Devdutt Nikam
Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग

देवदत्त निकम हे भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेच्या निमित्ताने वळसे पाटील आणि निकम एकत्र येणार होते. अपेक्षेप्रमाणे देवदत्त निकम सभेला उपस्थित राहिले होते. त्यावेळी वळसे पाटील यांनी बाजार समितीच्या संचालकपदी देवदत्त निकम निवडून आल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Dilip Walse Patil-Devdutt Nikam
NCP NEWS : काँग्रेस करणार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा घात : भाजपविरोधात निकराची लढाई

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत निवडून आल्यानंतर देवदत्त निकम हे यात्रा लग्नसमारंभाला उपस्थित राहून वळसे पाटील यांचा उल्लेख करायचे. त्यांच्या वतीने ते शुभेच्छा देत होते. यापुढील काळात निकम व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व हेवेदावे विसरून पुन्हा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करणार की? निकम आपले स्वतंत्र अस्तित्व जपणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Dilip Walse Patil-Devdutt Nikam
Karnataka Election Result : भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले जगदीश शेट्टार पिछाडीवर, तर लक्ष्मण सावदी आघाडीवर; भाजपचा बडा नेताही पिछाडीवर

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंचर बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी १७ जागा जिंकल्या, तर एका जागेवर देवदत्त निकम यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे बंडखोर विजयी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com