निवडणूक आली तरी काँग्रेसला मार्गच कळेना

पिंपरी काँग्रेस (Congress) शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांनी निरीक्षकांकडे तक्रारी केल्या आहे.
PCMC Congress

PCMC Congress

Sarkarnama

पिंपरी : काँग्रेसचा वर्धापनदिन नुकताच पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) आणि माजी अध्यक्ष सचिन साठे (Sachin Sathe) यांच्या गटांनी स्वतंत्रपणे साजरा केला. त्यामुळे त्याची चर्चा झाली. त्यातून शहर पक्षातील गटबाजी पुन्हा स्पष्ट झाली. मात्र, हे दोन्ही गट पावणेतीन महिन्यानंतर नवीन वर्षात रविवारी (ता.२ जानेवारी) एका ठिकाणी आले. शहर भेटीवर आलेले पक्षाचे शहर निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही गटांचे पदाधिकारी हजर होते. यावेळीही त्यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले.

यावेळी पावणेतीन महिन्यांपूर्वी नेमणूक झालेले शहराध्यक्ष डॉ. कदम यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांनी निरीक्षकांकडे तक्रारी केल्या. एका पदाधिकाऱ्याने,तर पक्ष दादागिरी नाही,तर गांधीगिरीच्या मार्गाने चालला पाहिजे, असे विधान करीत डॉ. कदमांच्या कार्यपद्धतीवर नेमके बोट ठेवले. त्यावर शहर कॉंग्रेसचे (Congress) महत्वाचे निर्णय सर्वानुमते घेतले जाणार असल्याचे राठोड यांना सांगावे लागले.

<div class="paragraphs"><p>PCMC Congress</p></div>
IPS कृष्ण प्रकाश यांनी गुंडांवर झाड फेकून मारले.. ही पिक्चरची स्टोरी की खरेच तसे घडले?

पिंपरी चिंचवड शहरात कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राठोड यांनी यावेळी केली. तसेच, या निवडणुकीत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,असे त्यांनी नाराज गटाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊनच काम करावे लागेल,असा सूचक इशारा त्यांनी एकाधिकारशाहीचे आरोप झालेल्या शहराध्यक्षांना दिला. तसेच, यापुढे शहर कॉंग्रेसच्या महत्वाच्या निर्णयात मी स्वत: लक्ष घालणार आहे,असे बजावण्यात ते विसरले नाहीत.

यावेळी माजी शहराध्यक्ष व सध्या प्रदेश सचिव असलेले सचिन साठे, कदम यांच्यासह पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शहर कार्याध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे, दिलीप पांढरकर, माजी महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्या शोभा पगारे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख आदी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>PCMC Congress</p></div>
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून नववर्षाची अशीही भेट..

साठे यांनी गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद ११ महिने रिक्त होते. तेथे ७ ऑक्टोबरला कदम यांची नियुक्ती झाली. त्यानंतरही त्यांचे दोन्ही गट कधीही कुठल्याच कार्यक्रमात एकत्र आले नव्हते. एवढेच नाही, तर त्यांनी पक्षाचा वर्धापनदिनही दोन स्वतंत्र कार्यक्रम घेऊन साजरा केला होता.सध्या शहरात पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक नाही. आमदार, खासदार शहरात असणे, तर दूरच राहिले. त्यामुळे गटबाजीला मुठमाती देऊन प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कालखंडातील पक्षाचे सोनेरी दिवस पुन्हा यावेत,अशी एकनिष्ठ पक्ष कार्यकर्त्यांची भावना आहे.या पार्श्वभूमीवर आणि पालिका निवडणुकीच्या तोंडेावर राठोड हे शहरात आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातही शहर पक्षातील मतभेद पुन्हा समोर आले. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन महत्वाचे निर्णय घेतले जातील,अशी काहीशी बचावाची व सामंजस्याची भुमिका त्यांना घ्यावी लागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com