निवडणूक सहा महिने लांबणीवर तरीही इच्छूकांकडून राष्ट्रवादीचे अर्ज घेणे सुरुच...

निवडणूक पुढे जाणार असली, तरी अर्ज देणे व ते भरून घेण्याचे काम हे १२ मार्चपर्यंत सुरुच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.
ncp
ncpsarkarnama

पिंपरी : मध्यप्रदेशच्या धर्तीवर (MP) महाराष्ट्र सरकारनेही (Mahavikas Aghadi Government) प्रभाग रचना तयार करण्याचे आणि निवडणुकीचे वेळापत्रक ठरविण्याचे राज्य निवडणूक आय़ोगाचे (State Election Commission) अधिकार स्वताकडे घेण्याचे विधेयक सोमवारी (ता.७ मार्च) विधीमंडळात संमत केले. त्यामुळे होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड, पुण्यासह राज्यातील एकून 14 महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका या सहा महिने लांबणीवर गेल्या आहेत. तरीही राष्ट्रवादीने आपली पिंपरी-चिंचवडमधील (PCMC Election 2022) निवडणूक तयारी न थांबवता ती तशीच पुढे सुरु ठेवली आहे. इच्छूकांकडून अर्ज घेणे त्यांनी बंद केलेले नाही. पहिल्याच दिवशी इच्छूकांनी त्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

ncp
भाजप, राष्ट्रवादीच्या वादात; शिवसेनेचे पारडे झाले जड

तब्बल १६५ इच्छूकांनी पहिल्याच दिवशी पक्षाचे अर्ज नेल्याचे राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयातून मंगळवारी (ता.८ मार्च) 'सरकारनामा'ला सांगण्यात आले. तसेच, निवडणूक पुढे जाणार असली, तरी अर्ज देणे व ते भरून घेण्याचे काम हे १२ मार्चपर्यंत सुरुच राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. तसे आवाहनच त्यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पुन्हा एकदा केले आहे. निवडणूका पुढे जाणार असल्याने अर्ज वाटप व स्वीकृती थांबविले जाण्याची शक्यता गृहित धरून त्यांनी हे स्पष्टीकरण आज दिले.

ncp
मी पाटील, पाठीमागून वार करीत नाही! बंटी पाटील अन् आवाडेंच्यात जुंपली

दरम्यान, पहिल्याच दिवशी १६५ इच्छूकांनी अर्ज नेलेल्यात ९० महिला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात ही जबाबदारी पाहत असलेले विनायक रणसुंभे आणि धनाजी तांबे यांनी दिली. एका महिलेने, तर उमेदवारीसाठी दावाही ठोकला. त्यांनी नेलेला अर्ज भरून दिला आहे. प्रभाग तीसमधून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी पक्षाकडे क्लेम केला आहे. पहिल्या दिवशी शंभर अर्ज जातील, अशी अपेक्षा होती. पण, प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाल्याने त्यापेक्षा कितीतरी जास्त इच्छूकांनी ते नेले, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्यालयातून देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in