Neelam Gorhe News : मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं असतानाच नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या...

Shivsena Political News : '' सोशल मीडिया जितका फायदेशीर तितकाच घातक...''
Neelam Gorhe
Neelam Gorhe Sarkarnama

संतोष आटोळे

Indapur : सोशल मीडिया जितका फायदेशीर तितकाच घातक ही बनत आहे. यामुळे आज समाज खूप दुभंगत चालला आहे. समाजाच्या भावना खूप तीव्र झाल्यामुळे जीवन संपवण्यासारखे चुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत युवकांनी संयम राखणे आवश्यक असून आपल्या भावना संवादातून मांडाव्यात असे आवाहन केले. कोणत्याही समाजावर अन्याय न होता आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून याबाबत लवकरच तोडगा निघेल अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी इंदापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यातील वंचित घटकांच्या विकासासाठी सरकार सकारात्मक आहे. मराठा, ओबीसी, मागासवर्गीय यांच्यासह सर्व समाजाच्यासाठी सरकारने महामंडळे,शिष्यवृत्त्या या माध्यमातून निधी देत समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.

Neelam Gorhe
Kolhapur Politics : 'रस्सी जल गयी, लेकिन बल नही गया' : खासदार महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल

गोऱ्हे म्हणाल्या, सोशल मीडिया जितका फायदेशीर तितकाच घातक ही बनत आहे. यामुळे आज समाज खूप दुभंगत चालला आहे. समाजाच्या भावना खूप तीव्र झाल्यामुळे जीवन संपवण्यासारखे चुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत युवकांनी संयम राखणे आवश्यक असून आपल्या भावना संवादातून मांडाव्यात असे आवाहन केले.(Latest Marathi News)

धनगर आरक्षणावर अजून तरी तोडगा नाही..

एकीकडे मराठा आरक्षणा(Maratha Reservation)चा प्रश्न पेटलेला असताना धनगर समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असल्याबाबत विचारले असता धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेकवेळा सभागृहात मांडण्यात आला आहे. परंतु, यावर अजूनतरी कोणाकडेही ठोस तोडगा नाही असेही गोऱ्हे म्हणाल्या.

Neelam Gorhe
CM Eknath Shinde News : बोगस 'OSD' मयूर ठाकरेचा धक्कादायक 'कारनामा' ; मुख्यमंत्र्यांच्या बुलेटप्रूफ आलिशान कारमधून...!

जीवन प्रवासाचा होणार उलगडा

नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेणाऱ्या "ऐसपैस गप्पा नीलमताईशी" या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत 13 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार असून यामध्यामातून त्यांच्या जीवन प्रवासासह अनेक राजकीय किस्से यांचे गुपित उलगडणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in