Devendra Fadnavis : ''महाविकास आघाडीनं त्यांचं घर सांभाळावं,उगीच..''; फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Pune Politics : महाविकास आघाडीने दोन-चार उमेदवार जरी उभे केले तरी...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Kasba & Chinchwad By Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यात कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्यात तर चिंचवडला भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीकडून नाना काटे तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे(Rahul Kalate) यांच्यात थेट लढत होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीवर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपसह महाविकास आघाडीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे नेतेमंडळी पुणे आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून आहेत. आता त्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी बुधवारी(दि.१५) पुण्यासह चिंचवडमध्ये मेगा बैठका घेत निवडणुकीसाठी मास्टरप्लान ठरवण्यात आल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीसांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतील विजयासाठी रात्री उशिरा दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा बुधवारी वाढदिवस होता. यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांशी निवडणुकीतील प्रचाराविषयी माहिती घेतली. तसेच जगताप या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, अश्विनी लक्ष्मण जगताप, शंकर जगताप, यासह इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची जयंती होती.

अजित पवारांच्या टीकेवर फडणवीसांचा पलटवार

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पक्षात बंडखोरी झाल्यानं त्यामागे कोणीतरी मोठा नेता असल्याचा आरोप केला होता. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी स्वतःचं घर सांभाळावं, उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीने दोन-चार उमेदवार जरी उभे केले तरी विजय हा अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Laxman Jagtap)यांचाच होणार आहे.

Devendra Fadnavis
Rohit Pawar Tweet : राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप? आमदार रोहित पवारांच्या टि्वटमुळे चर्चांना उधाण

मनसेने दिलेला पाठिंबा हा सशर्त नाही...

मनसेनं कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेच्या या भूमिकेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, मनसेने दिलेला पाठिंबा हा सशर्त नाही. मनसेने गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्व स्वीकारले आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, म्हणून आम्ही एका विचाराने चालत आहोत असंही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Dhnanjay munde : सरकारी अधिकारी गुंडाच्या टोळ्या चालवत आहेत का ?

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीका करताना म्हणाले, उमेदवारी अर्ज पाठीमागे घे म्हणून राहुल कलाटे यांची शेवटच्या मिनिटांपर्यंत मनधरणी केली. मात्र त्यांनी माघार घेतली नाही. यावेळी पवारांनी कलाटे यांना फुगीर बेडकाची उपमा दिली. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीपाठीमागे राज्यातील कोणीतरी मोठ्या नेत्यांचा हात असल्याची टीकाही पवारांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com