Mahesh Landge News : फडणवीसांच्या हस्ते एकाच दिवशी २३ भुमीपूजन, उद्घाटन करत लांडगेंची मंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेंबांधणी

Pimpri-Chinchwad News : आमदार महेश लांडगे यांनी २३ विकासकामांचे भुमीपूजन अन् उद्घाटन करीत सोमवारी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.
Devendra Fadnavis, Mahesh Landge
Devendra Fadnavis, Mahesh LandgeSarkarnama

Devendra Fadnavis Pcmc News : सत्तासंघर्षाच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच (ता.११) दिलेल्या निकालाने शिंदे-फडणवीस सरकार तरल्याने त्यांनी आता कामाचा धडाका लावला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २३ विकासकामांचे भुमीपूजन, आणि उद्घाटन करीत त्यांनी सोमवारी (ता.१५) आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्धा दिवसाचा दौरा करून पिंपरी महापालिकेच्या या कामांचे उद्घाटन, भुमीपूजन केले. पण, त्या कार्यक्रमावर महापालिका नाही, तर भाजपची व त्यातही शहराचे कारभारी भोसरीचे भाजप (BJP) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांचाच ठसा दिसून आला. संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव घेतले जात आहे. त्यासाठीच जणू काय त्यांनी आज मेगा सक्सेस इव्हेंट केल्याची चर्चा त्यानंतर ऐकायला मिळाली.

Devendra Fadnavis, Mahesh Landge
Nitin Gadkari Threat News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिसऱ्यांदा धमकीचा फोन; पोलीस अलर्ट

महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंगच या भुमीपूजन आणि उद्घाटनाच्या धडाक्यातून फुंकल्याचे दिसून आले. दरम्यान, आजच्या दौऱ्यात फडणवीसांच्या दुपारच्या जेवणाचा बेत हा लांडगेंच्या भोसरीतील निवासस्थानी होता. त्यासाठी खास पिठले भाकरी, मेथी आणि वांग्याची भाजी, आमरस, आळूवडी असा मेन्यू होता.

Devendra Fadnavis, Mahesh Landge
Rahul Narvekar News : आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासाठी कोणते निकष लावणार? नार्वेकर म्हणाले, जून-जुलैमध्ये...

मात्र, त्यांचे कार्यक्रम लांबल्याने त्यांना जेवणासाठी वेळ झाला. दुपारी तीन वाजता ते भोसरीत आले. दीड तास ते लांडगेंच्या घरी होते. यावेळी दोघांत बंद दाराआड चर्चाही झाली. ती मंत्रीपदाविषयी होती, का हे, मात्र कळू शकले नाही. या भेटीत लांडगेंच्या नातीलाही (मुलगी साक्षीची मुलगी) त्यांनी कडेवर घेत खेळवले. त्यामुळे सर्व लांडगे कुटुंबीय काही काळ भारावून गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com