पुण्यात मुसळधार : उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकले

सुमारे पाऊणे दहाच्या सुमारास अजितदादा वाहतूक कोंडीतून बाहेर पडले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

पुणे : विजेच्या कडकडाटासह शनिवारी (ता. ९ आक्टोबर) सायंकाळी पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यात शहराच्या पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते, त्यामुळे शहरात सर्वत्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्या वाहतूक कोंडीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल पाऊण तास अडकून पडले होते. (Deputy Chief Minister Ajit Pawar was stuck in a traffic jam for over an hour)

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. आजही सायंकाळपासून विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडात पावसाला सुरू झाली. हा पाऊस शहरभर असला तरी त्याचे प्रमाण पूर्व भागात प्रचंड मोठे होते. अवघ्या काही मिनिटांतच रस्ते जलमय झाले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यातच आज शनिवार असल्याने सुटीमुळे बाहेरगावी जाणाऱ्याचे प्रमाण जादा असते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सर्व वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला.

Ajit Pawar
फडणवीस, मुंडेंच्या त्या पत्राने पिंपरीतील रिक्षाचालकाचा नेता बनला ‘आमदार’

उपमुख्यमंत्री अजित पवार हे भोसले नगर येथील आपल्या निवासस्थानकडे जाण्यासाठी लोहगाव विमानतळावरून नऊ वाजून दहा मिनिटांनी बाहेर पडले. लोहगाव विमानतळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. नगर रस्त्यावरील हयात चौकापासून येरवडा शास्त्रीनगरमार्गे पुण्यात जाताना अजित पवार वाहतूक कोंडीत अडकले. शास्त्रीनगर भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे. सर्व रस्ते जाम असल्याने पवारांच्या ताफ्यालाही बाहेर पडता आले नाही. या वाहतूक कोंडीत अजित पवार तब्बल पाऊण तास अडकले होते. सुमारे पाऊणे दहाच्या सुमारास अजितदादा वाहतूक कोंडीतून बाहेर पडले.

Ajit Pawar
चिपी विमानतळाचे श्रेय कोणा एकट्याचे नाही : ठाकरे-राणेंसमोरच अजित पवारांनी सुनावले

शनिवारी रात्री उशिरापर्यंत नगर रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. विमान नगर, कल्याणी नगर भागातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली आहे. वीकेंड असल्यामुळे शनिवारी शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसून आली. त्यातच पाऊस असल्याने वाहने संथ गतीने जात होती. सायंकाळी पाच सुमारास सुरू झालेल्या पावसाचे पाणी शहरातील सर्व रस्त्यावर साचले होते. जसाजसा पाऊसचा जोर वाढत गेला, तसतशी शहरातील वाहतूक कोंडी वाढत गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com