राज ठाकरेंचा अल्टिमेटम पोलिसांनी मोडीत काढला; अजिदादांचा टोला

अजित पवारांनी (Ajit Pawar) पोलिसांना दिले स्पष्ट आदेश
Ajit Pawar, Raj Thackeray
Ajit Pawar, Raj Thackeraysarkarnama

माळेगाव : कायदा हतात घेवून कोणी कसलाही अल्टिमेटम दिला तरी पोलिसांनी ठरविले तर कोणी काहीही करू शकत नाही. या राज्यात सर्वजण सुरक्षित व निर्भयपणे राहू शकतात, अर्थात तसे सुरक्षिततेचे वातावरण कायम ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. अर्थात तशाच पद्धतीचे चांगले काम राज्याचे पोलिस राजकारण्यांना बळी न पडता करीत आहेत. हे सध्याच्या संवेदनशील वातावरणात स्पष्ट होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता त्यांचा अल्टिमेटम मोडीत काढल्याचे सांगितले. (Ajit Pawar Latest News)

Ajit Pawar, Raj Thackeray
वसंत मोरेंची महाआरती : मनसे पदाधिकाऱ्यांची दांडी; अतृत्प आत्मे म्हणून तात्यांचाही निशाणा!

माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. अजित पवार हे गेले काही दिवस राज ठाकरे यांच्यावर कठोरपणे टीका करत आहेत. तसेच त्यांची नक्कल करत राज यांची खिल्लीही उडवत आहे. आज मात्र त्यांनी राज यांचे आंदोलन फसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी तीन मे ही मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी कोणाचे ऐकणार नसल्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काॅग्रेसकडे गृहखाते असल्याने हा इशारा अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीलाही होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते त्यातही अजित पवार हे आक्रमकपणे राज यांच्यावर तुटून पडले.

राज यांचे एक तरी आंदोलन यशस्वी झाले का, असा सवाल करत कार्य़कर्ते हे नेत्यांच्या सांगण्यावरून आंदोलनात उतरतात आणि पोलिस केसेस अंगावर घेतात. दुसरीकडे हे नेते केवळ घरच्या गॅलरीत येऊन दर्शन देतात, अशी टीका अजित पवार यांनी पुण्यात बोलताना केली.

Ajit Pawar, Raj Thackeray
भर कार्यक्रमातच अजित पवारांसमोर तक्रार; बारामतीचे प्रांत पाच लाख मागत आहेत...

‘‘ ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. कुणाला हनुमान चालिसा म्हणायची असेल तर दुसऱ्याच्या दारात कशाला, आपल्या घरात म्हणावी. कोणताही धार्मिक उत्सव, सण साजरा करताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धकास परवानगी असून, त्याचे बंधन लावल्यास सर्वांचीच पंचाईत होइल. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, परंतु संविधानाच्या चौकटीत राहून वागले पाहिजे,’’असा इशाराही अजितदादांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in