माजी महापौरांना हवेत आपल्या नावाचे नाहीसे झालेले उदघाटनाचे फलक

राज्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) हे एकमेव शहर आहे की ते आपल्या माजी महापौरांची (Formers Mayor) बैठक घेते.
PCMC Mayor Mai Dhore & Commissioner  Rajesh Patil
PCMC Mayor Mai Dhore & Commissioner Rajesh PatilSarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) सत्तेत असेपर्यंत शहरात दररोजचा पाणीपुरवठा होत होता. २०१७ ला भाजप सत्तेत येताच वर्षभरात तो दिवसाआड करण्यात आला. त्यामुळे महिलावर्गाची नाही, तर माजी महापौरांचीही (Former Mayor) तक्रार आहे. ही चिंता सोमवारी (ता.२१ फेब्रुवारी) शहराच्या माजी महापौरांच्या बैठकीत अधोरेखित झाली. त्यांनी शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली. त्याला माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज (ता.२२फेब्रुवारी) दुजोरा दिला.

PCMC Mayor Mai Dhore & Commissioner  Rajesh Patil
शिवसेनेचे तीन आमदार वैतागले : पवार आणि ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्काराचे धाडस

आपल्या कार्यकाळात केलेल्य़ा विकासकामांची भुमीपूजने व उदघाटनाचे नाहीसे झालेले फलक पुन्हा लावण्याची आणि दिवंगत महापौरांच्या निवासस्थानी पुणे महापालिकेच्या धर्तीवर फलक लावण्याची मागणी माजी महापौरांनी बैठकीत केली. राज्यातील पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे की ते आपल्या माजी महापौरांची बैठक घेते. त्यांचे विचार, सूचना, मत जाणून घेते. मात्र, कोरोनामुळे गेले दोन वर्षे ही बैठकच झाली नव्हती. तरीही १९ पैकी निम्मे सुद्धा माजी महापौर उपस्थित नव्हते. सध्याचे सत्ताधारी पक्षाच्या या टर्ममधील दोन माजी महापौरांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली. परिणामी उपस्थित सात महापौर हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच होते.

PCMC Mayor Mai Dhore & Commissioner  Rajesh Patil
आमदार लांडगें पाठोपाठ जगतापांनाही झटका; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीत

महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौरांची बैठक झाली. तिला ममा महापौर कृष्णा ऊर्फ तात्या कदम, कविचंद भाट, संजोग वाघेरे पाटील, आर. एस. कुमार, अनिता फरांदे, हनुमंत भोसले, अपर्णा डोके यांच्यासह आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे उपस्थित होते.

PCMC Mayor Mai Dhore & Commissioner  Rajesh Patil
भाजप नगरसेविकेने का दिला राजीनामा आमदार जगतांपाकडून सांगण्यात आले कारण..

माजी महापौरांच्या दूरदृष्टीमुळे शहराचा विकास झपाट्याने होऊन राष्ट्रीय पातळीवर नाव होण्यास मदत झाल्याचे सांगत त्याचे श्रेय भाजपच्या विद्यमान महापौर ढोरे यांनी यापूर्वीचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांना दिले. दर तीन महिन्यांनी माजी महापौरांची बैठक घ्यावी, त्यांच्या सूचनांवर अंमल करावा, महत्वाच्या धोरणांमध्ये माजी महापौरांच्या सूचनांचा विचार करावा, पाणीपुरवठा धोरणात समानता आणावी आदी सूचना माजी महापौरांनी यावेळी केल्या. त्यांची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com