पिंपरीतील कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याची महापौरांकडे अजब मागणी

या अजब मागणीची चर्चा मात्र, पिंपरी -चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात रंगली आहे.
पिंपरीतील कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याची  महापौरांकडे अजब मागणी
Madhav Patil & Usha DhoreSarkarnama

पुणे : पिंपरी-चिंचवड (Pimpri -Chinchwad) शहरातील कुत्र्यांना चक्क वाघासारखा रंग देण्याची अजब मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव धनवे-पाटील (Madhav Dhanve-Patil) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर माई उर्फ उषा (Mayor Usha Dhore) ढोरे यांच्याकडे केली आहे.

Madhav Patil & Usha Dhore
पुणे - नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल..

माधव धनवे-पाटील महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हणाले की, शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रत्येक झाडाच्या सभोवती असणाऱ्या किमान 50 जिवांचे अस्तित्व असते. झाडाला दिल्या जाणाऱ्या रंगामुळे या जीवांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांचा सन्मान हिरावून घेऊ नका, व झाडांना विनाकारण रंग देण्याचे काम थांबवा असे त्यांनी सांगितले.

Madhav Patil & Usha Dhore
पुण्यात पालिका आधिकाऱ्यांचा अजब कारभार; पहिल्या बाजीरावांच्या नावाच्या पाटीला पैसे नाहीत म्हणे !

झाडांना रंगरंगोटी करणे जर महापालिका प्रशासनास चुकीचे वाटत नसेल तर, शहरातील सर्व कुत्र्यांना सुद्धा वाघासारखा रंग देण्यात यावा, अशी उपरोधक मागणी पाटील यांनी केली आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि झाडांना सन्मान मिळावा हा हेतू या मागणीमागे असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावर महापौरांनी त्यांच्या मागणीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, व झाडांना करण्यात येणारी रंगरंगोटी थांबवण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले आहे.

पाटील हे आंघोळीची गोळी या पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून अनेक पर्यावरण विषयक उपक्रम राबवतात. त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व राज्यातील विविध भागात शहराचे होणारे विद्रूपिकरण व झाडाला ठोकण्यात येणारे खिळ्यांना काढण्याचे मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांनी आता कुत्र्यांच्या अंगाला वाघासारखा रंग लावण्याच्या या अजब मागणीची मात्र, शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in