दिलीप मोहितेही जिल्हा बॅंक अध्यक्षपदाच्या शर्यतीत!

पुणे जिल्हा बॅंक अध्यक्षपदाची निवडणूक शनिवार (ता.१५) होणार आहे.
Dilip Mohite
Dilip Mohite sarkarnama

राजगुरूनग : पुणे जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक (PDCC Bank Election) झाली आहे. आता अध्यक्षपदाच्या हालचाली सुरु आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटीलही (Dilip Mohite Patil) आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खेडमधील कार्यकर्त्यांनी पोहिते पाटील यांना अध्यक्षपद देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

Dilip Mohite
नगरचे पालकमंत्री बदलणार : प्राजक्त तनपुरेंचे नाव आघाडीवर

सहकाराचे गाढे अभ्यासक असलेल्या मोहिते पाटील यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळावे, अशी आग्रही मागणी खेड तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडे केली आहे. गेली अनेक वर्षांपासून आमदार मोहिते पाटील यांना सहकार क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि अनुभव आहे. ते अनेक वर्षे खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच पीडीसीसी बँकेचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष या पदांवरून सहकारक्षेत्रात काम करत आहेत, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या अधिवेशनांमध्येही सहकार क्षेत्रावरील समस्यांवर आमदार मोहिते पाटलांनी अभ्यासपूर्ण मते मांडलेली महाराष्ट्राने पाहिली आहेत. पीडीसीसी बँकेचे संचालक झाल्यावर त्यांनी खेड तालुक्यातील शाखांचा कायापालट केला, असेही या कार्यकर्त्यांनी सांगितले. शाखांना देखणे रुप देतानाच कारभार शेतकरी हिताचा करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीचा चेहरामोहरा बदलताना समितीच्या उत्पन्नाची साधने वाढवण्याकडे कटाक्ष ठेवला.

Dilip Mohite
जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? निवडीच्या 24 तास आधी नाराज तेली राणेंच्या भेटीला

त्याच्या अनुभवांचा फायदा जिल्ह्याला व्हावा, यासाठी त्यांना पीडीसीसी बँकेचे अध्यक्षपद देण्यात यावे. खेड तालुक्यातील तमाम जनतेचीही तशी भावना आहे. अध्यक्षपद देऊन आमदार मोहिते पाटलांचा सन्मान करण्याची संधी घ्यावी, अशी विनंती या पदाधिका-यांनी पवार यांच्याकडे केली. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, अरुण चांभारे, बाळ ठाकूर आदी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in