"योगी आदित्यनाथ राजीनामा द्या "....राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध मोर्चा..

खंडोजीबाबा मंदिर चौक ते नामदार गोपाळकूष्ण गोखले चौकापर्यंत कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
collage (15).jpg
collage (15).jpg

पुणे : देशभरातील महिला आणि दलित यांच्यावरील वाढत्या अन्याय, अत्याचार आणि खूनांच्या घटना याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात झालेल्या बलात्कार आणि खूनाच्या घटनेचा निषेध करण्यात आला.   

खंडोजीबाबा मंदिर चौक ते नामदार गोपाळकूष्ण गोखले चौकापर्यंत कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.  उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरीत राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळावा, या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी प्रदिप देशमुख, स्वाती पोकळे, रविंद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, महेश हांडे, संतोष नांगरे, भोलासिंग अरोरा, संतोष बेंद्र्, लहु कांबळे, विजय बगाडे, श्रीनिवास दासारी, वैजनाथ वाघमारे, सचिन डाकले, महेश शिंदे , उपस्थित होते.
 
उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्‌विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे. पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्‍नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

हे सर्व असले तरी हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेड पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले. 

गेल्या 14 सप्टेबर रोजी पिडितेवर चार ते पाचजणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. या मुलीची प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मानेची हाडं तुटण्याबरोबरच जीभलेही जखम झाल्याचे दिसून येत आहे. बलात्कार आणि हत्याप्रकरणात पोलिसांना चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com