Amol Kolhe News: पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी; खासदार कोल्हे म्हणाले,'' शिवनेरी नावाला विरोध नाही,पण...

Mahesh Landge Vs Amol Kolhe : ''शिवनेरी नावाला विरोध नाही,पण ...''
Mahesh landge- Amol Kolhe
Mahesh landge- Amol Kolhe sarkarnama

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि.१४) पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं. मात्र, एका उद्घाटन समारंभात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी केली. तसेच नव्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्या, आम्हाला त्याचा सर्वात जास्त अभिमान वाटेल असं विधान केलं. परंतू, या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार लांडगेंच्या मागणीवर राजकीय उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.याचदरम्यान,शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Mahesh landge- Amol Kolhe
BJP News : भाजपच्या लाटेत सपाच्या अडीच हजार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त ; काँग्रेस, बसपा, आपच्या..

खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार लांडगेंच्या पुणे जिल्ह्याच्या मागणीवर कोल्हे म्हणाले, पुणे जिल्ह्याची विभागणी करून, शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनमानावर काही फरक पडणार आहे का? की ही केवळ राजकीय मागणी आहे? असा खडा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्या असा टोलाही आमदार महेश लांडगें(Mahesh Landge)ना लगावला.

मंत्री गडकरींचं 'ते' विधान....

डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, शिवनेरी नावाला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, शिवरायांनी केलेलं काम या सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. शिवरायाचं तत्व हे लोककल्याणकारी राज्य बसवण्याचं होतं असं स्पष्ट करतानाच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानाकडेही लक्ष वेधलं. गडकरींनी नवीन पुणं वसवण्याची वेळ आली आहे. लहान शहरातील लोक पुण्याकडे येत आहे. त्यांच्यामुळे पुणे शहरावर ताण यायला लागला आहे. त्यामुळे सुनियोजित शहराच्या माध्यमातून नवीन शहर वसवणं जास्त महत्वाचं असंही ते म्हणाले.

Mahesh landge- Amol Kolhe
Mahesh Landge News : पुणे जिल्ह्याच्या विभाजनामागे आमदार लांडगेंचे शिरूर लोकसभेचे गणित?

शिवनेरी नावाला विरोध नाही, पण...

डॉ. कोल्हे म्हणाले,शिवनेरी नावाला विरोध नाही, फक्त पुणे(Pune) जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणी पाठीमागची व्यवहार्यता तपासायला हवी. पुणे जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला जावा. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सारखा मोठा प्रकल्प आहे. ज्यामुळे जुन्नरचा प्रवासी काही मिनिटांत पुण्यात पोहचू शकेल. हा रेल्वे मार्ग देशातील एकमेव ब्रॉडगेजवर होऊ शकणारा प्रकल्प आहे. यामुळे लोकांच्या जीवनमानात फार फरक पडणार असल्याचं ते म्हणाले ते म्हणाले.

अजित पवार उपमुख्यमंत्री असताना...

त्यासोबतच इंद्रायणी मेडिसिटीची सारखी मागणी आहे. देशात असा प्रकल्प आतापर्यंत कोणत्याही शहरात झाला नाही आहे. त्यामुळे आरोग्याच्या सुविधांबाबत विचार करायला हवा. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना दोन्ही प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली होती. मात्र, त्यांनतर सरकार बदललं आणि हे सरकार यांसारख्या प्रकल्पावर काम करताना दिसत नाही आहेत. पण याच प्रकल्पामुळे मोठा विकास होणार आहे आणि अनेक लोकांना याचा फायदादेखील होणार आहे असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Mahesh landge- Amol Kolhe
Rahul Narvekar News : राहुल नार्वेकरांसमोर फक्त 16 च नाहीतर 54 जणांच्या विरोधात याचिका; इतर आमदार कोणते?

आमदार लांडगेंची मागणी काय?

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी उुपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे. लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळं पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा आणि त्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं अशी मागणी केली होती. लांडगेंनी अचानक पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणी करत राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com