श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर भाजपचा दावा? केसरकरांनी स्पष्टच सांगितले

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पिंपरी-चिंचवडचा (Pimpri-Chinchwad) दौरा केला.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama

पिंपरी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पिंपरी-चिंचवडचा (Pimpri-Chinchwad) दौरा केला. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई महापालिका तसेच राज्यातील नगरपालिका व जिल्हा परिषदाही आम्ही (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) जिंकू, असा मोठा दावा केला. राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर त्यांनी भाष्य करण्यास स्पष्ट नकार यावेळी दिला.

सरन्यायाधीशांनी सांगूनही न्यायालयीन प्रकरणांवर मिडिया ट्रायल चालते. मात्र, आम्ही त्यावर आणि सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या सुनावणीवर बोलणार नाही. तेथे जो निकाल येईल, तो, मात्र लोकशाही मजबूत करणारा असेल, असा दावा केसरकरांनी केला. रहाटणी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ते मिडीयाशी बोलत होते.

Deepak Kesarkar
NCP : बारामती जिंकण्याचे भाजपचे स्वप्न कधीचं पूर्ण होणार नाही ; राष्ट्रवादीनं सुनावले खडे बोल

न्यायालयीन प्रकरणांवर भाष्य करणे योग्य नाही. तेथे काय घडेल हे सांगणे योग्य नाही. त्यावर न बोलणंच योग्य, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. त्यावर बोलताना त्यांनी दावा करणे म्हणजे निवडून येणे नाही, असे उत्तर दिले. शिंदे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार याबाबत मुख्यमंत्री घोषणा करतील, असे ते म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Deepak Kesarkar
Hingoli : अशोक चव्हाण राज्यातील काॅंग्रेसचे एक नंबरचे नेते, ते पक्ष सोडूच शकत नाही...

शहरात उभारण्यात येणा-या विज्ञान आविष्कार नगरी (सायन्स सिटी) बाबतही त्यांनी माहिती घेऊन विविध सूचना केल्या. सायन्स सिटी विकसित करण्याचा महापालिकेचा प्रकल्प स्तुत्य असून त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in