पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा अखेर दाखल झालाच नाही !

viral Video : ‘‘व्हिडीओ’’ची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून तपासणी झाल्यानंतर त्या आधारे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
PFI latest news
PFI latest newssarkarnama

पुणे : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या समर्थकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांच्याकडून सांगण्यात येत होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत पुणे पोलिसांकडून (Pune Police) देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

PFI latest news
राजस्थानमध्ये राजकीय संकट: गेहलोत गटाच्या 90 आमदारांची राजीनामा देण्याची धमकी?

या प्रकरणी घोषणांच्या व्हायरल ‘व्हिडीओ’ची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून तपासणी झाल्यानंतर त्या आधारे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांकडून आधी सांगण्यात आले होते. मात्र, सायंकाळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी आली. त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील गोंधळ रात्रीपर्यंत सुरूच होता.

PFI latest news
विरोधकांची एकजूट झाली तर भाजपचा पराभव अटळ!

‘पीएफआय’च्या देशभरातील कार्यालयांवर छापे टाकून ‘एनआयए’ व स्थानिक ‘एसआयटी’ने छापे टाकून गुरूवारी देशभरातून १२० समर्थक व पदाधिकाऱ्यांना अटक केली. यामध्ये पुण्यातील २० जणांचा समावेश होता. या अटकेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी पुण्यात ‘पीएफआय’च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी या संघटनेच्या सुमारे ५५ ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल केल्याची बातमी शनिवारी प्रसिद्ध होताच या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला.

सोशल मिडीयावरील ‘व्हिडीओ’ पाहिल्यानंतर भाजपा, मनसे तसेच शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर काही तासातच गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. संबंधित व्हीडीओ न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून तपासून आल्यानंतर अहवालाच्या आधारे योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com