आरक्षण रद्दचा निर्णय मराठा समाजासाठी दुदैवी: खासदार संभाजीराजे - The decision to cancel the reservation is unfortunate for the Maratha community: MP Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आरक्षण रद्दचा निर्णय मराठा समाजासाठी दुदैवी: खासदार संभाजीराजे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 मे 2021

समाजातील सर्व घटकांनी संयम बाळगण्याची गरज

पुणे : मराठा समाजासाठीचे आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समाजासाठी दुदैवी आहे. हा निकाल धक्कादायक आहे. मात्र, या काळात समाजातील सर्व घटकांनी संयम बाळगण्याची गरज आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारसमोर आता केवळ सुपर न्यूमररीचा पर्याय आहे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचालयला हवीत, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.The decision to cancel the reservation is unfortunate for the Maratha community: MP Sambhaji Raje 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारनेदेखील प्रयत्न केले. मात्र, दुदैवाने त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा काळ कठीण असून समाजासाठी सयंमाचा आहे. मराठा समाजातील युवकांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाचा काळ आहे. आपल्या सर्वांसमोर मोठे संकट उभे आहे. त्यामुळे सयंम बाळगणे आवश्‍यक असल्याचे संभाजीराचे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अंतीम निकालात ही स्थगिती उठविण्यात आली असती तर मराठा समाजासाठी मोठा निर्णय ठरला असता. मात्र, दुदैवाने तसे घडले नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत अंतीम निकाल दिल्याचे वृत्त समसताच राज्यभर खळबळ उडाली. आरक्षण रद्द झाल्याचे कळताच मराठा समाजातील युवकांनी संताप व्यक्त केला. या पाश्‍र्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच राज्य सरकारच्यावतीने बैठकांची गडबड सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी बैठक आयोजित करण्यात आली असून न्यायालयाया निकालावर पुढे काय करता येईल, यावर बैठकीत प्रमुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. निकालानंतर मराठा युवकांकडून राज्यभरातून व्यक्त होणारी प्रतिक्रिया तसेच विरोधी पक्षांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यबाबत काय धोरण असावे याचीही चर्चा या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade

 

फडणवीस सरकारचा कायदा; गायकवाड अहवाल पाण्यात घालण्याचे काम राज्य सरकारने केले

 

   
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख