काय तो निर्णय घ्या; संभ्रमावस्था संपवा : शहराध्यक्षपदाबाबत पुण्यातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह 

माझी भूमिका स्पष्ट केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील तो निर्णय शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मला मान्य असेल..
bagave.jpg
bagave.jpg

पुणे : शहर कॉंग्रेसचा अध्यक्ष बदलायचा की विद्यमान अध्यक्ष रमेश बागवे यांनाच कायम ठेवायचे यापैकी कोणताही निर्णय घ्या. मात्र, याबाबत लवकर फैसला व्हायला हवा, अशी भावना पक्ष कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहे. कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी लवकर निर्णय करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या निवडणुका आपल्याच नेतृत्वाखाली व्हाव्यात, अशी भावना विद्यमान अध्यक्ष बागवे (Ramesh Bagave) यांनी व्यक्त केली आहे.(Decide what it is; End the confusion: Pune activists insist on the post of city president)  

दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात भेट दिली. विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचा यात समावेश होता.या भेटीत इच्छुकांनी आपली भूमिका प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासमोर मांडल्याचे समजते. शहराध्यक्ष बागवे यांनीही भूमिका स्पष्ट केली. गेल्या पाच वर्षात पक्षाला प्रतिकूल परिस्थिती होती. या कठीण काळात शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे.राज्यात सत्ता आल्यानंतर महापलिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर कुणाकडे जबाबदारी देण्यापेक्षा आपण अधिक सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जाऊ शकतो, असे बागवे यांनी पटोले यांना सांगितले.

या संदर्भात बोलताना बागवे म्हणाले, ‘‘ शहराध्यक्षपदाला गेल्या एप्रिल महिन्यात पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या पाच वर्षात ब्लॉकनिहाय चांगली संघटन बांधणी केली आहे. कोणत्या प्रभागात काय स्थिती आहे याचा अभ्यास केला आहे. गेले वर्षभर निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर पक्षाला अधिक चांगल्या यशासाठी पक्षाला माझा उपयोग  झाला तर अधिक आनंद होईल ही भावना पटोले यांच्या कानावर घातली आहे.’’

 माझी भूमिका व्यक्त केली असली तरी प्रदेशाध्यक्ष पटोले जो निर्णय घेतील तो पक्षाचा शिस्तपद्ध कार्यकर्ता म्हणून मला मान्य राहील. पक्षहितासाठी निर्णय लवकर व्हावा ही भावनादेखील प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातल्याचे बागवे यांनी सांगितले. शहराध्यक्षपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळावा. निवडणुका जवळ आल्याने काय तो निर्णय लकर व्हावा, अशी कार्यकर्त्यांचीदेखील भावना आहे, असे बागवे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

       
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com