Pune News : येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू : कुटुंबियांचा प्रशासनावर गंभीर आरोप

कुटूंबियाचे २४ डिसेंबरला अनिल गोंडेकर यांचे संदेशशी शेवटचे बोलणे झाले होते.
Pune News : येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू : कुटुंबियांचा प्रशासनावर गंभीर आरोप

Yerwada Jail News : पुण्यातील येरवडा तुरुंगात तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे कैद्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कैद्यांचे कुटूंबीय आक्रमक पवित्रा घेत तुरुंगाबाहेर ठिय्या आंदोलन केले. कुटूंबियांनी तुरुंग प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

संदेश अनिल गोंडेकर (वय-26 रा. डोणजे, हवेली), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय-32 रा. मोरगाव, बारामती) शाहरुख बाबू शेख (वय-29 रा. कोंढवा) अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. 

Pune News : येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू : कुटुंबियांचा प्रशासनावर गंभीर आरोप
Shivsena : आता आक्रमक चेहरा करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतृत्व !

सिंहगड परिसरातील डोणजे गावचा रहिवासी असणाऱ्या संदेश अनिल गोंडेकर याला २०१८ साली खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरोपी संदेशचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून होत आहे.

मृत कैदी संदेश याचे वडील मोलमजुरी करतात तर आई धुण्याभांड्याची कामे करते. संदेशचे वडील अनिल गोंडेकर आणि कलावती गोंडेकर हे दोघेही दर शनिवारी येरवडा मध्यवर्ती कारागृहात संदेशला भेटण्यासाठी जात जायचे. २४ डिसेंबरला अनिल गोंडेकर यांचे संदेशशी शेवटचे बोलणे झाले होते.

कैदी आजारी असतानाही तुरुंग प्रशासनाकडून कैद्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना वेळेवर औषधे दिली जात नव्हती, त्यामुळेच त्यांची प्रकृती सातत्याने खालावली होती. पण आम्हाला प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला आणि आमचा माणूस कायमचा आमच्यातून निघून गेला, असा आरोप संदेशच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in