पुणे पालिका वाॅर्डरचना : आराखड्यासाठी सहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

काम पूर्ण न झाल्याने महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती.
पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवनसरकारनामा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या कामाला निवडणूक आयोगाने सहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आराखडा बनविण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे या महिनाअखेर कच्चा आराखडा पूर्ण करून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने महापालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती.

पुणे महानगरपालिका भवन
देशमुखांवर आरोप करणारे परमबीरसिंह सीएम फंडात भरणार १५००० रुपये...

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. कोरोनामुळे जनगणना होऊ शकलेली नाही, त्यामुळे या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या १० वर्षात लोकसंख्या वाढल्याने कायद्यात बदल करून महापालिकांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १६१ वरून १७३ इतकी निश्‍चीत करण्यात आली आहे. ही नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने प्रभागांचा आकार कमी होऊन प्रभागांची संख्या ४२ वरून ५५ इतकी होणार आहे.

पुणे महानगरपालिका भवन
बावनकुळेंचे टेन्शन गेले : ३३४ मतदार सहलीला पाठवले...

२०२२ च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी होणार याकडे नगरसेवक, इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. यापूर्वी प्रभाग रचना कशी होऊ शकते याचे आखाडे बांधले जात होते. पण आता नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने नेमका कोणता प्रभाग कसा तोडणार, नवा प्रभाग कसा तयार होणार, त्याला कोणता भाग जोडणार हे सर्वच गुलदस्त्यात आहे. महापालिकेने १५ दिवसांची मुदत वाढवून मागितली. मात्र, निवडणूक आयोगाने सहा डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सध्या कामाची स्थिती काय आहे, अडचणी काय येत आहेत यावर चर्चा केली.प्रभाग रचनेचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, काही भागाचे काम शिल्लक आहे. ३० नोव्हेंबरच्या पूर्वी प्रारूप आराखडा तयार होईल, असे बैठकीत सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com