हार-सत्कार नाकारला, दौंडकरांनी अनुभवले शरद पवारांचे सामाजिक भान

दौंड तालुक्यातील एका खासगी कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
Sharad pawar
Sharad pawar Sarkarnama

दौंड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक जाणिवेचा आणि संवेदनांचा अनुभव आज दौंडकरांना आला. दौंड तालुक्यातील एका खासगी कार्यक्रमात शरद पवारांनी अहमदनगर इथल्या शासकीय जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना श्रध्दांजली वाहण्याची सूचना तर केलीच, पण त्याशिवाय हार आणि सत्कार स्विकारण्यास स्पष्ट नकार देत त्यांनी सामाजिक संवेदना जोपासत उक्ती आणि कृतीचा प्रत्यय उपस्थितांना करून दिला.

दौंड - नगर राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी (ता. दौंड) इथं 'पवार पॅलेस' या एका मंगल कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या कार्यक्रमात उपस्थितांना शरद पवार यांच्या सामाजिक भानाची प्रचिती आली. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माजी आमदार रमेश थोरात, प्रदीप गारटकर, हेमलता फडके, शीतल कटारिया, अप्पासाहेब पवार उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, नगर मधील शासकीय रूग्णालयात लागलेल्या आगीत निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपल्या शेजारी एवढी भयाण दुर्घटना घडलेली असताना उद्घाटनाचा आनंद सोहळा साजरा करणे हे योग्य नाही. त्यामुळेच पवार कुटुंबीयांनी साधेपणाने उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharad pawar
'शरद पवार, अजितदादा अन्न चोरणाऱ्या कार्यकर्त्यांना थारा देणार नाहीत'

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष दिवाळी साजरी करता आली नाही, परंतु यंदा परिस्थिती सुधारल्याने दिवाळी साजरी करता आली. रूग्णांचे प्रमाण कमी असले तरी कोरोना गेलेला नाही म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही पवारांनी दिला.

नक्की मालक कोण....?

सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या नेतेमंडळी आणि नातेवाईकांच्या घर, कार्यालयांवर सक्तवसूली संचलानालय (ईडी) व प्राप्तीकर विभागाच्या (आय.टी.) धाडी आणि शोध मोहिमा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपल्या मनोगतात 'पवार पॅलेस' या कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. परंतु नावात 'पवार' असल्याने याचे नक्की मालक कोण? ही चर्चा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी कोपरखळी देखील मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com