दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी घेतली थेट पंतप्रधान मोदींची भेट

PM Narendra Modi|Rahul Kool|BJP : पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत स्वतः आमदार राहुल कुल यांनी फेसबुकवर पोस्ट करीत माहिती दिली आहे.
Rahul Kool, Narendra Modi
Rahul Kool, Narendra ModiSarkarnama

बारामती : पुणे जिल्ह्यातील दौंड चे भाजपचे (BJP) आमदार राहुल कुल (Rahul Kool) व महाराष्ट्रातील भाजपच्या खासदार व आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या संदर्भात स्वतः आमदार कुल यांनी फेसबुकवर पोस्ट करीत माहिती दिली आहे.

Rahul Kool, Narendra Modi
मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर अखेर राज ठाकरेंचा मोरेंना प्रतिसाद; भेटीसाठी दिवस ठरला

कुल यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची आज दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे जलविद्यूत निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे १०० टिमसी पाणी कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविण्यात आले असून पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची बाब पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली.

Rahul Kool, Narendra Modi
काँग्रेसचा आमदार भाजपच्या वाटेवर? स्थापना दिनाला हजेरी लावून दिला धक्का

लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे, विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते," अशी कुल यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : 12 तारखेला 12 वाजवणार... आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा

राज्यात चालू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळले आहे. उच्च न्यायालयाने काल एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांना निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी अशा सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु या निर्णयावर कमालीचे नाराज झाल्याचे दिसत आहेत. आझाद मैदानात असलेले एसटी कर्मचारी आज आक्रमक झाले.

आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकवर दगडफेक, चप्पलफेक केली. यावेळी शरद पवार यांच्या घरासमोर मोठा गोंधळ उडाला होता. शरद पवार यांच्या घराच्या अगदी जवळ हे आंदोलक पोहचले होते. हा गोंधळ उडाला तेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके पोलीस होते.

एकीकडे हा गोंधळ सुरु असताना संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच १२ तारखेला १२ वाजवणार असल्याचा इशारा दिला आहे.तर काही जणांनी एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन हा भाजपचा पुर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे.

रम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि पोलीसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवत आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये भरुन पुन्हा आझाद मैदानात सोडले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्तेही शरद पवारांच्या घरासमोर पोहचले आणि त्यांनीही शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना आपण बोलण्याची तयारी दर्शवली.

गुरुवारी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर निर्णय दिल्यानंतर कर्मचारी अधिकच आक्रमक झाले होते. त्यानंतर आज शरद पवार यांच्या घराबाहेर त्यांचा हा रोष पाहायला मिळाला. मात्र १२ तारखेला कर्मचारी काय करणार, आजच्या आंदोलनाची माहिती पोलिसांना कशी कळाली नाही, याबाबत गुढ अद्यापही कायम आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी मोठी घोषणा केली आहे, शरद पवारांच्या घरासमोर केलेल्या या दगडफेकीच्या घटनेची चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com