राष्ट्रवादीच्या नेत्यावर मेहेरबानी दाखवणे भोवले : दौंडच्या पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

अवघ्या १४ महिन्यांत घुगे यांची बदली झाली आहे.
Daund Police Station
Daund Police Station Sarkarnama

दौंड (जि. पुणे) : ॲट्रोसिटी आणि विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नेता तथा माजी नगराध्यक्ष बादशह शेख याच्यासह फरारी आरोपांना पकडण्यासाठी आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसांना ४८ तासांचा कालावधी दिला होता. दौंड (Daund) पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दौंडचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांची पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राणेंच्या दौऱ्यानंतर पोलिसांनी यात लक्ष घालत पोलिस निरीक्षकाचीच उचलबांगडी केली आहे. (Daund police inspector transferred to Pune headquarters)

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी एका आदेशाद्वारे विनोद घुगे यांची मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली केली आहे. दौंड पोलिस ठाण्याचा तात्पुरता प्रभार निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. अवघ्या १४ महिन्यांत घुगे यांची बदली झाली आहे. राष्ट्रवादीचा नेता बादशहा शेख याच्यावर मेहेरबानी करणे घुगे यांना महागात पडल्याची चर्चा दौंड शहरात रंगली आहे.

Daund Police Station
...तर राष्ट्रवादीच्या बादशहा शेखची दौंड शहरातून धिंड काढेन : आक्रमक राणेंचा इशारा

दौंड शहरातील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तब्बल २१ दिवसांचा विलंब केला होता. पीडितेच्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता व दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी गुन्हे ९ नोव्हेंबर रोजी दाखल केले आहे.

Daund Police Station
उमेश पाटलांनी आता मोहोळमधून निवडणुकीला उभचं राहावं : राजन पाटलांनी दिले चॅलेंज

पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक न केल्याने आमदार नीतेश राणे यांनी १७ नोव्हेंबर रोजी पीडित कुटुंबाची भेट घेऊन दौंड पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तसेच, आरोपींना अटक न करण्यामागील पोलिसांच्या भूमिकेची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही आमदार राणे यांनी केली होती.

Daund Police Station
‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधी...’ या वादग्रस्त विधानावर राजन पाटलांची अखेर दिलगिरी

दौंड पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच शंका घेत फरारी आरोपींसमवेत काही पोलिस अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा गंभीर आरोपही आमदार राणे यांनी केल्यानंतर दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली झाली आहे.

पोलिसांची सौम्य भूमिका शंकास्पद

विनयभंग व ॲट्रोसिटी प्रकरणात दौंड पोलिसांनी सुरुवातीला फिर्याद नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल केला नाही. तब्बल २१ दिवसांच्या विलंबाने गुन्हा दाखल केला. मात्र, बादशहा शेख याच्यासह एकूण २० आरोपींपैकी फक्त एकाला अटक केल्याने पोलिसांची सुरुवातीपासूनची सौम्य भूमिका शंकास्पद ठरली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com