Mass Death in Daund: दौंडमधील 'त्या' प्रकरणाला वेगळे वळण; जादूटोणा'च्या संशयाने घेतला सात जणांचा बळी

दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.
Mass Death in Daund
Mass Death in DaundSarkarnama

Daund News: दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा (Bhima) नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह (Dead bodies) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सात जणांची हत्या झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यात आणखी काही जणांनाचाही समावेश असून पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.

मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) या सात जणांचे भीमा नदीपात्रात मृतदेह सापडले होते. सुरुवातीला हे आत्महत्या असल्याचे उघड झाले. पण पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्या झाल्याचे निषप्ण्ण झाले आहे. धक्कादायक म्हणजे करणी केल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनीच या सात जणांची हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

Mass Death in Daund
Shahaji Bapu Patil : शहाजीबापूंविरोधात सांगोल्यात सरपंच आक्रमक; नक्की चाललयं काय?

मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार त्यांच्याच चुलत भाऊ असलेल्या धनंजय पवार यांच्यासोबत तीन महिने त्याच्या सासुरवाडीला गेला होता. पण परताना त्यांच्या अपघात झाला. या अपघातात धनंजय पवार यांच्या मृत्यू झाला. पण अमोल पवार यांच्या कुटुबियांनी धनंजय पवार यांच्यावर करणी केली, म्हणून धनंजय यांचा मृत्यू झाला, असा संशय धनंजय यांच्या कुटुंबियांना होता. या रागातून धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची हत्या करण्याचा प्लॅन केला.

Mass Death in Daund
Daund News : दौंड हादरले; एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळले

धनंजय यांच्या कुटुंबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांना यवत पर्यंत आणलं. रात्रीच्या सुमारास त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकण्यात आले. तर तीन लहान मुले झोपेत असतानाच त्यांनाही भीमा नदीत फेकण्यात आले. करणी केल्याच्या संशयावरुनच धनंजय पवार यांच्या कुटुबियांनी मोहन पवार यांच्या कुटुंबियांची कट रचून हत्या केली. हे पोलिसांनी केलेल्या तपासात निषप्ण्ण झाले आहे. यात आणखी पाच-सहा जणांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com