Daund Bazar Committee : दौंड बाजार समिती आमचीच; भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, निकालाकडे लक्ष

NCP vs NCP : दौंड बाजार समितीत आजी-माजी आमदार आमने-सामने
Rahul Kul, Ramesh Thorat
Rahul Kul, Ramesh ThoratSarkarnama

Rahul Kul and Ramesh Thorat : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी भाजप व मित्र पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. या बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. २८) तब्बल ९९.२८ टक्के मतदान झाले आहे. आता मतमोजणी शनिवारी (ता. २९) दुपारपर्यंत होणार आहे. त्यानंतर दौंड बाजार समितीवर कुणाचे वर्चस्व राहणार, हे स्पष्ट होईल. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयाचा दावा केला जात आहे.

Rahul Kul, Ramesh Thorat
Bhor APMC : सर्वपक्षीयांनी संग्राम थोपटेंना आव्हान दिलेल्या भोर बाजार समितीचा निकाल नऊपर्यंत लागणार

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांचे वर्चस्व आहे. यावेळी भाजपचे आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरांताविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुल आणि थोरात यांच्यात थेट लढत झाली. या बाजार समितीच्या एकूण दोन हजार ६६७ पैकी दोन ६४८ मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Rahul Kul, Ramesh Thorat
Bhor Bazar Samiti Result : सोसायटीत थोपटेंचे उमेदवार आघाडीवर; तर ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीयांची ‘काँटे की टक्कर’!

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक आमदार राहुल कुल (Rahul Kul) व माजी आमदार रमेश थोरात या दोघांनीही प्रतिष्ठेची केलेली आहे. बाजार समितीवरील माजी आमदार थोरातांची एकहातील सत्तेला धक्का देण्यासाठी आमदार राहुल कुल ताकद लावल्याचे दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत तब्बल ९९.२८ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे आता शनिवारी (ता. २९) होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

Rahul Kul, Ramesh Thorat
Satara APMC : समोरासमोर येऊ; पण कुठं आणि कस ते सांगा : शिवेंद्रराजेंनी आव्हान स्वीकारले

दौंड बाजार समिती (Daund APMC) सहकारी संस्थांच्या ११, ग्रामपंचायत ४, व्यापारी २, हमाल १ अशा एकूण १८ जागा आहे. या जागांसाठी एकूण दोन हजार ६६७ मतदार मतदान करणार आहेत. त्यात सरकारी संस्थेत १ हजार ५६९, ग्रामपंचायत ८७६, व्यापारी १८९ व हमाल ३३ अशा मतदारांचा समावेश आहे. त्यातून सोसायटीच्या ११ जागांसाठी एक ५५९, ग्रामपंचायतच्या चार जागांसाठी ८७०, व्यापाऱ्यांच्या २ जागांसाठी १८६, हमालच्या एका जागेसाठी ३३ असे मतदान झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com