वैयक्तिक टीकेवरून राज्यमंत्री भरणे भडकले; हर्षवर्धन पाटलांना दिला निर्वाणीचा इशारा

भविष्यात वैयक्तिक, एकेरीवर बोलला तर आमच्याकडेही खूप मसाला असल्याचे सांगून निर्वाणीचा इशारा दिला.
Dattatreya Bharane
Dattatreya BharaneSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : विरोधकांची (माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, Harshvardhan Patil) यांची १९९५ पूर्वी काय अवस्था होती, हे जनतेला माहीत आहे. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. मात्र, भविष्यात आमच्यावर वैयक्तिक टीका केल्यास आमच्याकडेही खूप मसाला असल्याचे सांगत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना वैयक्तिक टीका-टिपण्णीवरून निर्वाणीचा इशारा दिला. (Dattatreya Bharane's warning to former Harshvardhan Patil over personal criticism)

इंदापूर तालुक्यातील काझड येथील विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात भरणे बोलत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात रास्ता रोको आंदोलनामध्ये भरणे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना भरणे यांनी अप्रत्यक्षपणे माजी मंत्री पाटील यांना इशारा दिला.

Dattatreya Bharane
...अन्यथा शिवसेनेची अवस्था अकाली दलासारखी होईल : हर्षवर्धन पाटलांचे भाकित!

भरणे म्हणाले की, मला कुणावरही वैयक्तिक टीका करावयाची नाही. संपूर्ण तालुक्याला माझी शेती, घरदार माहीत आहे. विरोधकांना (हर्षवर्धन पाटील) १९९५ पासून जनता ओळखत आहे. त्यांची काय अवस्था होती, त्यांनी स्वत:ला तपासावे. आपले काय होते, कसे झाले, आभाळातून काय पडले का? आज काय आपली अवस्था आहे, लाेकांना सगळं माहित आहे. कशामुळे झाले आहे, हेही माहित आहे. कृपा करून भविष्यात असे वैयक्तिक, एकेरीवर बोलला तर आमच्याकडेही खूप मसाला असल्याचे सांगून निर्वाणीचा इशारा दिला. फळं असणाऱ्या झाडालाच लोक दगड मारतात. विरोधकांचे सगळे संपले असून उसने अवसान आणून दिशाभूल करत असल्याचे सांगितले.

Dattatreya Bharane
फंदफितुरी खपवून घेणार नाही; थेट हकालपट्टी करण्यात येईल : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, हनुमंत बंडगर, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड रणजित निंबाळकर, बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, पंचायत समितीच्या सदस्या शितन वणवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवकचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, विक्रम निंबाळकर, यजुर्वेेंद्र निंबाळकर, सरपंच अजित पाटील उपस्थित होते.

Dattatreya Bharane
कात्रज डेअरी निवडणूक : शिरूरला या कारणामुळे तिसरी जागा बोनस मिळाली!

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सोयरीक होत नव्हती!

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे इंदापूर तालुक्यातील काझड-शिंदेवाडी भागातील लोकांशी बाहेरचे नातेवाईक सोयरीक (लग्न) करण्यास तयार होत नव्हते. तसेच, पूर्वी या भागामध्ये विरोधक आल्यानंतर लाकडी-निंबोडी योजनेचे काम मार्गी लावण्याची खोटी आश्‍वसाने विरोधक देऊन मते पदरात पाडून घेत होते. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. निवडणूक झाली की, सगळ काम संपत होते. मात्र २०१२ पासून या भागाची परस्थिती बदली असून या भागातील रस्त्यांची सर्व कामे मार्गी लागली आहेत. लाकडी-निंबोडी योजनचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com