इंदापूरकरांनी घरी बसवलेले कोल्हापुरात भाजपच्या प्रचाराला गेले होते : भरणेंचा पाटलांना टोमणा

कोल्हापुरातील भाजपच्या पराभवानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका
इंदापूरकरांनी घरी बसवलेले कोल्हापुरात भाजपच्या प्रचाराला गेले होते : भरणेंचा पाटलांना टोमणा
Dattatray Bharane-Harshvardhan PatilSarkarnama

कळस (जि. पुणे) : ‘‘निवडणुकीत पडलेल्या माणसाला दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार नाही. पडलेल्या माणसानं गप्प घरीच बसणं चांगलं. नाहीतर लोक म्हणतील, अरे बाबा तूच तुझ्या मतदार संघात पडलाय, आम्हाला काय सांगायला आलाय. याचा प्रत्यय कोल्हापूरला झालेल्या पोटनिवडणूकीत दिसून आला आहे. इंदापूरच्या जनतेने घरी बसवलेले तेथे प्रचारला गेले होते,’’ अशी टीका राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर नाव न घेता केली. (Dattatray Bharane criticizes Harshvardhan Patil after BJP's defeat in Kolhapur)

इंदापूर तालुक्यातील डाळज क्रमांक दोन येथील कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे बोलत हेाते. त्यावेळी त्यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या चुली बंद असताना स्वतःला साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून मिरवणाऱ्यांनी किमान चहाची पुडी तरी वाटप केली का? जनतेची कळवळ असल्याचा केवळ आव आणत विरोधक भूलथापा मारतात. त्यांना सध्या काही काम उरले नाही, यामुळे त्यांच्याकडून जातीयवादाचे विष पेरण्याचे काम केले जात आहे.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्यास ११ लाखांचे, तर बांगड्या भरणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस!

विरोधकांसाठी एक रुपयाचंही काम शिल्लक ठेवलेले नाही. ते आता काहीच काम करू शकत नाहीत, त्यामुळेच जबरदस्तीने एखाद्याच्या घरी चहा प्यायचाय, जेवण करायचंय असा आग्रह करुन ते लोकांची दिशाभूल करत आहेत. गरिबांबद्दल खूप प्रेम असल्याचा आव आणला जात आहे. मात्र, त्यांची नार्को चाचणी करायला हवी; म्हणजे खरं काय ते समोर येईल, असे भरणे म्हणाले.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
भाजपचा मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : विश्वजित कदमांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की, आम्हाला केलेल्या कामाचा गाजावाजा करण्याची सवय नाही. तालुक्यातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे गावागावांतील प्रत्येकाला लगतच्या गावाला पोचणे सुखकर होईल. प्रत्येक गावात रस्त्यामुळे रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. विकास कामासाठी आता घराचा वाढपी असल्यामुळे पळी भरुन वाढण्याचे काम केले जात आहे. या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये, यासाठी उजनी धरणात बुडीत बंधारा बांधण्याचे नियोजन आहे.

Dattatray Bharane-Harshvardhan Patil
मी राष्ट्रवादीत जाणार नाही; भाजपमध्येच समाधानी!

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे डी. एन. जगताप, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच ॲड. प्रदीप गारटकर, विकास कुंभार, दादासाहेब गलांडे, श्रीमंत ढोले, दीपक जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात सरपंच ॲड. प्रदीप जगताप यांनी गावाला निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्यमंत्री भरणे यांचे आभार मानले. अमोल धापटे यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.