धोका वाढला!`स्वाइन फ्लू`नंतर आता गोवरसाठीही क्वॅारंटाईन सेंटर सुरु होण्याची शक्यता

PCMC : वायसीएम रुग्णालयात गोवर आयसोलेशन कक्ष त्वरित सुरु करण्याची मागणी...
PCMC, YCM, quarantine Center Latest News
PCMC, YCM, quarantine Center Latest News Sarkarnama

पिंपरी:स्वाईन फ्लूचे उच्चाटन होत नाही, तोच गोवर या दुसऱ्या संसर्गजन्य आजाराची साथ आली असून मुंबईत, तर तिने कहर केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही ती येण्याची भीती असल्याने शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना वेळीच सावध केले आहे. महापालिकेच्या (PCMC) वायसीएम रुग्णालयात (YCM) गोवर आयसोलेशन कक्ष त्वरित सुरु करण्याची मागणी त्यांनी आज केली. (PCMC, YCM, quarantine Center Latest News)

PCMC, YCM, quarantine Center Latest News
Lockdown news : जग पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने; कोरोनामुळे शाळा, कॉलेज, कार्यालये बंद

उद्योगनगरीसह पुण्यातही वेगाने पसरणाऱ्याा गोवर आजाराने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात पसरल्यास अनेक लहान बालकांच्या जिवाला धोका ठरू शकतो, याकडे आमदार जगतापांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

त्यामुळे या आजाराबाबत निष्काळजीपणा करून चालणार नाही,असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला आहे. या आजारावर अद्याप कोणतेही औषध नसल्याने लस देणे हा एकमेव पर्याय आहे. तसेच तो झाल्यानंतर केवळ त्याची लक्षणे नियंत्रित करून उपचार केले जातात. त्यामुळे या रोगाला तातडीने प्रतिबंध करण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्वतंत्र गोवर आयसोलेशन कक्ष प्रशासनाने तयार करण्याची नितांत गरज. त्यांनी प्रतिपादित केली.

PCMC, YCM, quarantine Center Latest News
Rohit Pawar : व्वा रे महाराष्ट्र सरकार ; असे रोहित पवार का म्हणाले ?

दरम्यान, शहरात डेंग्यूने देखील विळखा घातल्याने त्यालाही पायबंद घालण्यासाठी विशेष उपाययोजना करावी,अशी मागणी जगताप यांनी केली आहे.आधीच कोरोनामुळे त्रस्त होऊन त्यातून कसेबसे सावणाऱ्या नागरिकांना पुन्हा संसर्गजन्य आजारांनी त्रस्त केले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com