पुण्यात दांडेकर पुलाला पोलीस छावणीचे रूप;आंबिल ओढ्यावरील अतिक्रमण कारवाईला सुरवात

यावेळी एका संघटनेच्या कार्यकर्त्याने आत्मदनाचा प्रयत्न केला.
IMG-20210624-WA0037.jpg
IMG-20210624-WA0037.jpg

पुणे : आंबील ओढ्यावर अतिक्रमण केलेल्या झोपड्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC) केलेल्या कारवाईला स्थानिक नागरीकांनी विरोध केला. यावेळी एका संघटनेच्या कार्यकर्त्याने आत्मदनाचा प्रयत्न केला. यावेळी काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी शेकडो पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरू केली.(Dandekar bridge in Pune turned into a police camp; encroachment on Ambil stream started) 

ओढ्याच्या दोन्ही बाजूस राहात असलेल्या नागरीकांना महापालिकेने याआधीच या ठिकाणच्या झोपड्या सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र, आज प्रत्यक्ष कारवाईच्यावेळी अनेकांनी आपापल्या घरातील साहित्य भरून नेते तर काहीजणांनी या कारवाईला विरोध करीत घरातील साहित्य बाहेर काढण्यास विरोध केला. कारावईला विरोध करण्यासाठी शेकडो नागरीक एकत्र जमले. यामुळे दांडेकर पूल परिसराला पोलीस छावणीचे रूप आले.

कायद्यातील या तरतुदीनुसार आंबिल ओढ्यासारख्या मोठ्या ओढ्यांच्या कडेने महापालिका आणि हद्दीलागतच्या भागात दोन्ही बाजूस ९ मीटर रुंदीचा ग्रीनबेल्ट ठेवणे बंधनकारक केले आहे. मात्र, आंबिल ओढ्याच्या कडेने नऊ मीटर ग्रीनबेल्ट सोडाच, ओढ्यातच भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची मूळ वहनक्षमता जवळपास साठ टक्क्यांनी कमी झाली आहे.गेल्यावर्षीच्या पावसात या भागातील अनेक घरात पाणी शिरण्याचे प्रमाण मोठे आहे. ओढ्याच्या काठावर अतिक्रमणे वाढत असल्याने दरवर्षी या संकटात भर पडत आहे.

पावसाळ्यात वेळोवेळी घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडत असतानाही नाले बुजविण्याचे प्रकार अद्याप थांबले नसल्याचे पुढे आले आहे. पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ, नाले बुजविण्याची किमया होत असल्याने कधी नव्हे ते रस्त्या-रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिल्याचा अनुभव पुणेकरांना घ्यावा लागला आहे.आंबिल ओढा कात्रज तलावापासून सुरू होऊन वैकुंठ स्मशानभूमीशेजारी मुठा नदीला मिळतो. कात्रजपासून मुठा नदीला मिळेपर्यंतच्या सर्वच भागात गेल्या अनेक वर्षापासून या ओढ्यावर अतिक्रमण झाले आहे. गेल्या काही वर्षात यात आणखी भर पडली आहे. ओढ्यातल्या पुराचा त्रास याच झोपड्यांना होत असतो. तरीही येथील नागरीकांचा अतिकमणे हटविण्यास विरोध कायम आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com