नातं असावं तर असं : आमदारांच्या वाढदिवसाचा केक कापूनच उपसरपंचपद स्वीकारले!

उपसरपंचपदाचा पद्‌भार स्वीकारत अशोक पवारांचा वाढदिवस तीन दिवस आधीच साजरा करायला लावला.
Dattabhau Hargude-Ashok Pawar
Dattabhau Hargude-Ashok PawarSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : आमदार अशोकबापूंसाठी काय पण..’ म्हणत शिरूर (shirur) तालुक्यातील सणसवाडीचे उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे या कार्यकर्त्याने चक्क आपली उपसरपंचपदाची निवड आमदारांच्या सोयीनुसार ठेवली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आमदार पवारांच्या उपस्थितीतच उपसरपंचपदाचा पद्‌भार स्वीकारत अशोक पवारांचा (Ashok Pawar) वाढदिवस तीन दिवस आधीच साजरा करायला लावला. आमदारांच्या वाढदिवसाचा केक कापूनच त्यांनी आपल्या पदभार हाती घेतला. त्यानंतर आख्ख्या गावाला पेढे वाटून गुलाब पुष्पांनी आमदार पवारांची मिरवणूकही काढण्यात आली. (Cut the MLA's birthday cake three days before and accepted post of deputy sarpanch)

शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे यांची पुतणे उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे हे आमदार अशोक पवार यांचे प्रचंड चाहते. क्रांतीवीर प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सागर दरेकर यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठीची निवडणूक आमदार पवारांना सोयीची व्हावी; म्हणून शुक्रवारी (ता. २६ ऑगस्ट) ठेवण्यात आली.

Dattabhau Hargude-Ashok Pawar
मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावणाऱ्या आवताडेंचे जंगी स्वागत

गावातील भैरवनाथ मंदीर, दतात्रय मंदीर, नरेश्वर मंदीर आदींची भव्य फुलांनी सजावट करून अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करण्यात आली. प्रारंभी ग्रामपंचायात कार्यालयात उपसरपंचपदासाठी दत्ताभाऊ हरगुडे यांची निवड जाहीर करुन तिथून गुलाब पुष्पवृष्टीने पवार व दत्ताभाऊ हरगुडे यांना भव्य व्यासपीठाच्या शामियान्यात आणले गेले. आमदार पवार यांच्या हस्ते दत्ताभाऊ हरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पवार यांचा वाढदिवस तीन दिवस (३० ऑगष्ट रोजी अशोक पवार यांचा वाढदिवस असतो) आधीच केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने त्याची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होती.

Dattabhau Hargude-Ashok Pawar
...तर शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा : माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला

दत्ताभाऊंचा नवस चर्चेत

सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक चारमधून मी बिनविरोध निवडून यावा आणि पुढे उपसरपंच व्हावे; म्हणून वॉर्डातील अनेक मतदारांनी ग्रामदैवताला नवस केल्याचे या वेळी दत्ताभाऊ हरगुडे यांनी सांगितले. यापुढेही वॉर्डातील लोकांना पुन्हा नवस करावा लागणार आहे, असे सांगून त्यांनी आपल्या भावी राजकीय इच्छाशक्तींचे गूढ मात्र निर्माण केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in