बिल्डर अविनाश भोसले, गोयंका, ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांवर गुन्हा

दस्त नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (builders avinash bhosale), विनोद गोयंका (vinod goenka), विकास ओबेरॉय (Vikas Oberoi) यांच्यासह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिल्डर अविनाश भोसले, गोयंका, ओबेरॉय यांच्यासह चौदाजणांवर गुन्हा
avinash bhosalesarkarnama

पुणे : जमीन दस्त तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (builders avinash bhosale), विनोद गोयंका (vinod goenka), विकास ओबेरॉय (Vikas Oberoi) यांच्यासह चौदाजणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चेतन काळूराम निकम यांनी हवेली दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक आठ येथे तक्रार अर्ज दिले होते. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी सह जिल्हा निबंधक मुद्रांक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी केली होती. त्यामध्ये उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तिनी जमीनचे खरेदीखत दस्त, विकसन करारनामा या कागदपत्रांमध्ये फेरफार केला तसेच भारतीय नोंदणी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याचे सहदुय्यम निबंधक संगावार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

avinash bhosale
दम असेल तर एकटं-एकटं येऊन लढा ; दानवेंचे आघाडीच्या नेत्यांना आव्हान

बांधकाम व्यावसायिक अविनाश निवृत्ती भोसले (रा. लॉरी इस्टेट, बाणेर), विनोद गोयंका (रा. कर्मयोग, एनएस रोड, जुहू, मुंबई), विकास रणबीर ओबेरॉय (रा. एनएस रोड, जुहू, मुंबई), सिद्धार्थ राजेंद्र मयूर (रा. लकाकी रस्ता, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), सुमन निवृत्ती निकम, नितीन निवृत्ती निकम, देवकी निलेश निकम, नीलम विकास सूर्यवंशी, अक्षय विकास सूर्यवंशी (सर्व रा. संगमवाडी), सपना अभय जैन (रा. आर्यम बंगला, श्रद्धा कॉलनी, जळगाव), कल्पना प्रमोद रायसोनी (रा. जळगाव), विकास विठ्ठलराव पवार, विपुल विठ्ठलराव पवार (दोघे रा. कपीलनगर, खाणगाव रस्ता, लातूर), ज्योती राजेंद्र पवार (रा. शिवर्कीती, घोरपडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भारतीय नोंदणी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमवाडी येथील चेतन निकम यांच्या जमिनीच्या खोटया नोंदी करण्यात आल्या. दस्तामध्ये त्यांची जमीन नमूद न करता ती विक्री करणाऱ्या व्यक्तीची असल्याचे भासविण्यात आले. काही खरेदी खतातील सर्वेक्षण क्रमांक चुकीचे टाकून मूळ मालकी असलेल्या अरदेसर बमनजी सेठा यांच्या जमिनीची देखील चुकीची नोंद केली, असे फिर्यादीत संगावार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.