Crime News : पोलिसाला लगावली चापट; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ. वंदना मोहितेंची पोलीस कोठडीत रवानगी!

Dound Police Crime News : कर्तव्यावर असणाऱ्या वर्दीतल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण..
Crime News :
Crime News :Sarkarnama

Pune News (Dound News) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौंड शहरातील महिला कार्यकर्त्या डॉ. वंदना मोहिते (Dr. Vandana Mohite) यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याप्रकरणी आता त्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Hemant Shedge) यांनी ही माहिती दिली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे सुरक्षेचे कामकाजात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दादागिरी करत दादागिरी करत, कर्मचाऱ्याला मोहिते यांनी मारहाण केली होती.

याबाबत अधिक तपशील असे आहे की, दि. १५ जून रोजी गुरूवारी पुणे सोलापूर रस्ता या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोल नाका या ठिकाणी महामार्गावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासासाठी पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी नितीन भानुदास कोहक, (Nitin Kohak) सोबतच उपनिरीक्षक रोकडे व इतर पोलीस कर्मचारी काम करत होते.

Crime News :
Maharashtra Politics : सकाळच्या शपथविधीनंतर शिवसेना आमदार ठाकरेंना म्हणाले, " काहीही करा पण .." ; देशमुखांचा गौप्यस्फोट

पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करून, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, त्या अनुषंगाने वाहतूकीच्या नियोजनाचे ते काम करत होते. आपल्या कर्त्यव्यावर असताना, याच वेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वंदना मोहिते आपल्या मोटारीने प्रवास करीत होत्या.

यावेळी मोहिते यांनी पोलीस कर्मचारी नितीन कोहक यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांच्या गालावर चापट मारली. वाहतूक नियोजनासाठी लावलेले बॅरिकेटींग जबरदस्तीने काढत पुण्याच्या बाजून वाहनाने निघून गेल्या. याप्रकरणी डॉ. वंदना मोहिते यांच्यावर यवत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण हे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहे.

Crime News :
Praful Patel On PM Post : "…तर तेव्हाच शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते," प्रफुल्ल पटेल यांचा दावा !

प्रकरणी आता त्यांना अटक करून, शुक्रवारी दि. १६ जून रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकऱणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक माधुरी तावरे (Madhuri Taware) करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com