Crime News : महाविद्यालयीन तरुणीची हत्या : पुणेकर धास्तावले!

Crime News : नात्यातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ते दोघे विवाह करणार होते.
Crime
Crimesarkarnama

पुणे : प्रेम प्रकरणातून एका महाविद्यालयीन तरूणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील औंध परिसरात बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ एकच उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी पळून गेला असून, याप्रकरणी आता चतु:शृंगी पोलीस स्थानकात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Bharat Jodo : गुजरात, हिमाचलमध्ये का नाही ? जयराम रमेश यांनी सांगितले कारण..

श्वेता रानवडे (वय २२, रा. औंध) असे मृत तरुणीचे नाव असून, लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून या तरुणीचा खून झाला आहे. श्वेताचे तिच्या नात्यातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ते दोघे विवाह करणार होते. परंतु तरुणाची वागणूक चांगली नसल्यामुळे, श्वेताने त्याला लग्नास नकार दिला होता. त्यामुळे आरोपीने बुधवारी (ता.९) दुपारी औंध जकात नाका परिसरातून जात असलेल्या या तरुणीला अडवून तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली.

या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपीचे नाव अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार ‌वाघचवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in